IND vs NZ Final : टीम इंडिया खेळणार १४ व्यांदा फायनल, २५ वर्षांपूर्वीचा किवीचा बदला घेण्याचा मौका मौका

Champions Trophy 2025 Final : टीम इंडिया १४ व्यांदा आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यात रोहित शर्माकडे मोठा विक्रम करण्याची संधी आहे.
IND vs NZ : न्यूझीलंडने फायनल गाठली अन् टीम इंडियाचं टेन्शन वाढलं; हे कारण तुम्हाला माहितच नसेल
ind vs nztwitter
Published On

Champions Trophy 2025 Final IND vs NZ : हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया चॅम्पियन होण्यापासून एक पाऊल दूर आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आज दुबईच्या मैदानात चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना होणार आहे. भारतीय संघ १४ व्यांदा आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहचलाय. भारतीय संघाने २०२४ मधील टी२० विश्वचषकावर नाव कोरले होते. तर २०२३ च्या वनडे विश्वचषकाचा उपविजेता राहिला आहे. भारतीय संघाकडे न्यूझीलंडचा २५ वर्षांपूर्वीचा बदला घेण्याची संधी आहे.

भारतीय संघाने १९८३ मध्ये पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने बलाढ्य वेस्ट इंडिजता ४३ धावांनी पराभव केला होता. त्यानंतर ८ वर्षानंतर भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला. हा सामना न्यूझीलंड आणि भारत या दोन संघादरम्यान झाला होता. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ४ विकेटने पराभव केला होता. आता २५ वर्षांनतर भारतीय संघाला या पराभवाचा बदला घेण्याची संधी असेल.

चॅम्पियन्स ट्रॉफीचा दोन वेळा विजेता -

भारतीय संघाने २००२ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये जागा मिळवली. भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये लढत होणार होती. पण पावसाने हजेरी लावली. दोन दिवस पाऊस धो धो कोसळला. त्यामुळे भारत आणि श्रीलंका यांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारतीय संघ त्यानंतर २००३ वनेड विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहचला होता, पण ऑस्ट्रेलियाने १२५ धावांनी मात दिली होती. भारताने २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले होते. धोनीच्या नेतृत्वातील टीम इंडियाने इंग्लंडला धूळ चारली होती. भारत दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता ठरला होता.

धोनीच्या नेतृत्वात भारताला मोठं यश -

भारताने २००७, २०११ आणि २०१३ या आयसीसीच्या तीन स्पर्धा धोनीच्या नेतृत्वात जिंकल्या आहेत. २००७ टी२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानचा पाच धावांनी पराभव केला होता. २०११ च्या वनडे विश्वचषकात भारताने श्रीलंकेचा सहा विकेटने पराभव केला होता.

भारताचे जोरदार कमबॅक -

२०१४ टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका या दोन देशामध्ये झाला होता. या महामुकाबल्यात भारताला सहा विकेटने पराभवाचा सामना करावा लागला होता. २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. पहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. २०२३ च्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला ऑस्ट्रेलियाने मात दिली होती. पण भराताने पुन्हा कमबॅक केले. भारताने २०२४ टी२० विश्वचषकावर नाव कोरले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com