
Rohit Sharma Record : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना खेळला जाणार आहे. सामना सुरु होण्यापूर्वी टॉस झाला. हा टॉस न्यूझीलंडच्या कर्णधाराने जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण टॉसच्या वेळी रोहित शर्माने सर्वांचे लक्ष वेधले. आजच्या सामन्यात टॉस हरत रोहितने नवा विक्रम केला.
रोहित शर्मा सलग १५ व्या सामन्यामध्ये टॉस हरला आहे. भारतीय कर्णधारामुळे पंधरा सामन्यांमध्ये सलग टॉस हरण्याच्या विक्रमाची नोंद टीम इंडियाच्या नावावर झाली. आज टॉस झाल्यानंतर रोहित शर्मा स्वत: हसायला लागला. टॉस गमावल्यानंतरची त्याची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. असा आगळावेगळा विक्रम करणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय कर्णधार आहे.
टॉस गमावल्यानंतर रोहित काय म्हणाला?
'आम्हाला टॉसचं टेन्शन नाही. आम्ही चांगले क्रिकेट खेळत आहोत. हा आणखी एक महत्त्वाचा सामना आहे. या सामन्यात काय चांगलं करता येईल, यावर आमचा भर असेल. न्यूझीलंड खूपच चांगला संघ आहे. आमच्यापुढे आणखी एक चॅलेंज असेल. आजच्या सामन्यासाठी संघात कोणताही बदल नाही, मागील सामन्यातील विजयी संघ कायम असेल.'
'दुसऱ्या इनिंग्समध्ये फलंदाजी करण्यास काहीच हरकत नाही. खेळपट्टी चांगली आहे, जास्त काही बदल झालेला दिसत नाही. आम्ही आधी गोलंदाजी करत आहोत. न्यूझीलंडला कमीत कमी धावसंख्येवर रोखण्यावर आमचा भर असेल. तुम्ही सामन्यात किती चांगले आणि कसं खेळलात हे दिवसाच्या शेवटी महत्त्वाचे ठरणार आहे', असे रोहित शर्मा म्हणाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.