
Ind Vs Nz Match : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यामध्ये कुलदीप यादवने सलामीवर रचिन रविंद्र आणि केन विल्यमसन या दोघांना बाद केले. फक्त ८ बॉल्सच्या अंतराने कुलदीपने दोन विकेट्स घेतल्या. रचिनची विकेट पडल्यानंतर केन विलियम्सन कॅच आऊट झाला. सलग दोन खेळाडू बाद झाल्यानंतर रोहित शर्माची बायको आणि मुलगी चक्क नाचायला लागले.
कुलदीप यादवने दहाव्या ओव्हरमध्ये रचिन रविंद्रला बाद केले. त्यानंतर बाराव्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलमध्ये केन विलियम्सनची कुलदीपने कॅच घेतली. केन बाद झाल्यानंतर स्टेडियममधील भारतीय चाहते आनंदाने नाचू लागले. या जल्लोषात रोहित शर्माची बायको रितिका सजदेह आणि मुलगी समायरा देखील होते. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रचिन रविंद्र आणि केन विलियम्सन हे दोघेही भारतासाठी डोकेदुखी ठरु शकले असते. उपांत्य फेरीतल्या सामन्यामध्ये दोघांनी शतकीय कामगिरी केली होती. त्यामुळे ते लवकर बाद होणे गरजेचे होते. जेव्हा रचिन पाठोपाठ केनही कॅचआऊट झाला, तेव्हा सर्वजण नाचायला लागले. रितिका, समायरासह अनुष्का शर्माच्या रिएक्शनची देखील चर्चा होत आहे.
दरम्यान न्यूझीलंडच्या संघाने १०० धावांचा टप्पा पार केला आहे. आजच्या सामन्यामध्ये भारतीय फिरकीपटू चमकत आहेत. कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी विकेट्स घेतल्या आहेत. न्यूझीलंडला कमीत कमी धावांवर रोखणे हे भारतीय गोलंदाजांचे लक्ष आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड हा अटीतटीचा सामना दुबईत सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.