
Virat Kohli : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यामध्ये टॉस जिंकत न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या संघाने ५० षटकांमध्ये २५१ धावा केल्या. न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा डॅरल मिचेलने केल्या. तर वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले.
सामन्यामध्ये हार्दिक पंड्या ४८ व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत होता. या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर विराट कोहलीने विकेटच्या दिशेने जोरदार थ्रो केला. या थ्रोमुळे मिचेल सँटनर रनआऊट झाला. सँटनर आऊट झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल व्हायला सुरुवात झाली. २०१९ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या उपांत्य फेरीचा विराटने आजच्या सामन्यात बदला घेतला असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.
२०१९ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतसमोर न्यूझीलंडचे आव्हान होते. तेव्हा एम एस धोनी रनआऊट झाल्याने भारताला सामना गमवावा लागला होता. त्या एका रनआऊटमुळे टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर गेली होती. तेव्हाच्या रनआऊटचा बदला विराटने न्यूझीलंडच्या कर्णधाराला बाद करुन घेतला असे लोक म्हणत आहेत.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडवर भारतीय फिरकीपटू वरचढ ठरले. वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा या तीन फिरकीपटू गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना जास्त धावा करु दिल्या नाही. एकूणच सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये भारताचे पारडे जड असल्याचे नेटकरी म्हणत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.