Yuzvendra Chahal : धनश्री वर्मानंतर युजवेंद्र चहल तरुणीच्या प्रेमात? फायनल मॅचमध्ये दिसली 'मिस्ट्री गर्ल'ची झलक, फोटो व्हायरल

Ind vs Nz Live Match : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील अंतिम सामना सुरु आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यात युजवेंद्र चहलच्या बाजूला बसलेल्या मिस्ट्री गर्लची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
Yuzvendra Chahal
Yuzvendra ChahalSaam Tv
Published On

Ind vs Nz Final : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना सुरु आहे. टॉस जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या संघाने ५० ओव्हर्समध्ये २५१ धावा केल्या. त्याचे ७ गडी बाद झाले. दोन्ही संघांसाठी हा महत्त्वपूर्ण सामना आहे. अशातच या हायवॉल्टेज सामन्यादरम्यान फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या नावाची चर्चा होत आहे.

युजवेंद्र चहल भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना पाहण्यासाठी दुबईत पोहोचला आहे. तो स्टेडियमच्या कॅमेऱ्यामध्येही कैद झाला. गंमत म्हणजे त्याच्या सोबत एक तरुणीही दिसली. त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चहल या तरुणीला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आल्या आहेत.

व्हायरल फोटोंमध्ये चहलसोबत दिसणाऱ्या तरुणीचे नाव आरजे महवश असे आहे. ती भारत-न्यूझीलंड सामना पाहण्यासाठी दुबईला पोहोचली आहे. तिचे आणि चहलचे एकत्र फोटो व्हायरल होत आहेत. या व्हायरल फोटोंमुळे धनश्री वर्मानंतर युजवेंद्र चहल आरजे महवशला डेट करत असल्याचे लोक म्हणत आहेत.

Yuzvendra Chahal
Ind Vs Nz Live : कॅमेरामॅन जोमात, प्रेक्षक कोमात; फायनलमध्ये खेळाडूंपेक्षा या गोष्टींची होतेय चर्चा

याआधीही आरजे महवशचे चहलशी नाव जोडले गेले होते. तेव्हा या डेटिंगच्या चर्चांना तिने अफवा म्हणून फेटाळले होते. पण एकत्र फायनल सामना पाहायला गेल्यानंतर खरंच चहल आणि महवशमध्ये काहीतरी सुरु असल्याचे चाहते म्हणत आहेत. फोटोंमुळे युझवेंद्र चहलच्या डेटिंग लाईफच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायला लागल्या आहेत.

Yuzvendra Chahal
Ind Vs Nz Live : आधी रोहित, मग गिलकडून सारखीच चूक; एक नाही तर दोनदा सुटली कॅच, व्हिडीओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com