
Ind Vs Nz Final : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधला महामुकाबला सुरु आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड या अंतिम सामन्यामध्ये दोन्ही संघ एकमेकांवर वरचढ ठरण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय फिरकीपटूंच्या नियंत्रणात खेळ असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान रोहित आणि गिल यांच्याकडून झालेल्या मिसफील्डची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
३५ व्या ओव्हरमध्ये ग्लेन फिलिप्स फलंदाजी करत होता. तर रविंद्र जडेजा गोलंदाजी करत होता. ओव्हरमध्ये सुरुवातीला फिलिप्सने शॉट मारायचा प्रयत्न केला. रोहित शर्माच्या दिशेने बॉल गेला. बॉल पकडण्याचा रोहितने प्रयत्न केला. पण त्याच्या हातून बॉल निसटला. कॅच सुटल्याने रोहित स्वत:वरच काहीसा रागावला.
पुढे ओव्हरच्या शेवटी देखील शुबमन गिलकडून फिल्डिंग करताना चूक झाली. फिलिप्सने फटका मारल्यानंतर गिलकडे कॅच पकडण्याची संधी होती. पण त्याने देखील कॅच सोडला. एकाच ओव्हरमध्ये पहिल्यांदा कर्णधार रोहित शर्मा आणि दुसऱ्यांदा शुबमन गिलकडून कॅच सुटल्याने ग्लेन फिलिप्सला दोनदा जीवनदान मिळाले.
दरम्यान आजच्या अंतिम सामन्यामध्ये भारताचे पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे. भारताच्या फिरकीपटूंनी सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. वरुण चक्रवर्तीने यंगच्या रुपात न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. पुढे कुलदीपने रचिन रविंद्र आणि केन विलियम्सन यांना मैदानाबाहेर पाठवले. त्यानंतर रविंद्र जडेजाने टॉम लॅथम आऊट केले. पुढे वरुणने फिलिप्सलाही बाद केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.