virat kohli twitter
क्रीडा

IND vs SL, Virat Kohli: मानलं राव विराटला! बॉल बॅटला लागला, DRS घेतला; अंपायरने दिलं LBW आऊट,नेमकं काय घडलं?

Ankush Dhavre

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना सुरु आहे. हा सामना कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर सुरु आहे. दरम्यान या सामन्यात विराटची तिक्ष्ण नजरेचा नमुणा पाहायला मिळाला आहे. विराटने डीआरएस घ्यायला लावल्याने भारताला विकेट मिळाला आहे.

तर झाले असे की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची गोलंदाजी सुरु असताना, ३९ वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज गोलंदाजीला आला होता. सिराजला हे षटक टाकण्यापू्र्वी एकही विकेट घेता आला नव्हता. त्यामुळे या षटकात त्याने जीव ओतून गोलंदाजी केली.

या षटकातील पाचवा चेंडू खेळण्यासाठी समरविक्रमा स्ट्राईकवर आला. हा त्याचा पहिलाच चेंडू होता. त्याने संधी साधली आणि पहिलाच चेंडू यॉर्कर टाकला. हा चेंडू इतका वेगात होता की, थेट बॅटला जाऊन लागला. चेंडू लागून विराट कोहलीच्या हातात गेला. मात्र विराट आणि मोहम्मद सिराजने एलबीडब्ल्यूसाठी अपील केली. अंपायरने त्याला नॉट आऊट घोषित केलं. विराट आणि सिराजला सोडून कोणालाच विश्वास नव्हता की, चेंडू बॅटला जाऊन लागला आहे. मात्र त्याने रोहितला डीआरएस घ्यायला भाग पाडलं आणि डीआरएसमध्ये दिसून आलं की, चेंडू बॅटला लागण्यापूर्वी त्याच्या बुटांना स्पर्श करुन गेला आहे.त्यामुळे त्याला आऊट घोषित करण्यात आलं.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

टीम इंडियाची प्लेईंग ११ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रियान पराग, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

श्रीलंकेच्या ताफ्यात कोण कोणते शिलेदार -

अविष्का फर्नांडो, पथुम निसंका, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका (कर्णधार), जनिथ लियानागे, कामिंदु मेंडिस, डुनिथ वेलालगे, महीश तीक्ष्णा, जेफरी वेंडरसे, असिथा फर्नांडो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT