IND vs SL : निर्णायक वनडेला रोहितचा प्लॅन काय? पंतला संधी की दुबेचा पत्ता कट, पाहा संभाव्य प्लेईंग 11

Team India Playing XI, IND vs SL 3rd ODI: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना बुधवारी पार पडणार आहे.
IND vs SL : निर्णायक वनडेला रोहितचा प्लॅन काय? पंतला संधी की दुबेचा पत्ता कट, पाहा संभाव्य प्लेईंग 11
rohit sharma with shivam dubecanva
Published On

भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेत गेल्या २७ वर्षांपासून भारतीय संघाचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे. या २७ वर्षांमध्ये भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध खेळताना एकही वनडे मालिका गमावली नव्हती. मात्र आता सुरु असलेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ ०-१ ने पिछाडीवर आहे. मालिकेतील पहिला सामना बरोबरीत राहिला. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे तिसरा सामना हा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

IND vs SL : निर्णायक वनडेला रोहितचा प्लॅन काय? पंतला संधी की दुबेचा पत्ता कट, पाहा संभाव्य प्लेईंग 11
IND vs SL, 2nd ODI: टीम इंडियाने सामना कुठे गमावला? कोचने सांगितलं नेमकं कारण

श्रीलंका विरुद्ध सुरु असलेली वनडे मालिका ही चॅम्पियन्स ट्रॉफी २०२७ स्पर्धेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. श्रीलंकेविरुद्ध पॉवरहाऊस असूनही भारतीय संघाला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये रोहित शर्माने दोन्ही सामन्यांमध्ये चांगली सुरुवात करुन दिली. मात्र मधल्या फळीतील फलंदाजांना टिचून फलंदाजी करता आलेली नाही. शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे हे फ्लॉप ठरले आहेत.

IND vs SL : निर्णायक वनडेला रोहितचा प्लॅन काय? पंतला संधी की दुबेचा पत्ता कट, पाहा संभाव्य प्लेईंग 11
Paris Olympics : नीरज चोप्रा, विनेश फोगट अॅक्शनमध्ये, हॉकीचा संघ खेळणार सेमीफायनल!

भारतीय संघाची प्लेइंग ११ बदलणार?

मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. या सामन्यासाठी केएल राहुल आणि शिवम दुबेला विश्रांती दिली जाऊ शकते. तर रियान पराग आणि रिषभ पंतला संधी दिली जाऊ शकते.

या २ खेळाडूंना संधी मिळणार?

श्रीलंकेत आतापर्यंत फिरकी गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. गेल्या सामन्यातही फिरकी गोलंदाजांनी मिळून भारतीय संघाचा डाव गुढांळला. त्यामुळे या सामन्यासाठी रियान परागचा समावेश करणं भारतीय संघासाठी फायदेशीर ठरेल. कारण, तो अतिरिक्त फलंदाजासह फिरकी गोलंदाजाचीही जागा भरुन काढू शकतो. तर केएल राहुल फलंदाजीत दोन्ही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला आहे. त्यामुळे रिषभ पंतला संधी दिली जाऊ शकते.

IND vs SL : निर्णायक वनडेला रोहितचा प्लॅन काय? पंतला संधी की दुबेचा पत्ता कट, पाहा संभाव्य प्लेईंग 11
Paris Olympics 2024, Vinesh Phogat: ऐसी धाकड है! विनेश फोगाटचा सेमिफायनलमध्ये प्रवेश

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल/रिषभ पंत (यष्टीरक्षक), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com