IND vs SL : केएल राहुलचा पत्ता कट, ऋषभ पंतला संधी, निर्णायक सामन्यात रोहितनं डाव टाकला, पाहा प्लेईंग 11

IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आज निर्णायक सामना होत आहे. श्रीलंकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
IND vs SL
indian cricket teamtwitter/bcci
Published On

IND vs SL : अखेरच्या वनडे सामन्यासाठी रोहित शर्माने आपल्या संघात महत्वाचे दोन बदल केले आहेत. रोहित शर्माने केएल राहुल आणि अर्शदीप सिंह यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यांच्याजाही विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि अष्टपैलू रियान पराग (Riyan Parag) याला संधी दिली आहे. दोन्ही सामन्यात भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केली होती. सोपे सामने थोडक्यात गमावले, त्यामुळे आजच्या निर्णायक सामन्यात मोठे बदल करण्यात आले आहेत. अनुभवी केएल राहुल याला संघाबाहेर बसवण्यात आले आहे.

श्रीलंकेचा कर्णधार चरीथ असलंका यानं कोलंबोच्या मैदानात पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल जिंकला. आर. प्रेमदासा स्टेडियमवर हा तिसरा सामना सुरु आहे. तिन्ही सामन्यात नाणेफेकीचा कौल रोहित शर्माच्या विरोधात गेला आहे. श्रीलंकेचा कर्णधार असलंका यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताने आपल्या ताफ्यात दोन महत्वाचे बदल केले. तर श्रीलंकेच्या संघातही एक महत्वाचा बदल करण्यात आलाय. महिशा पथिराना याला प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्यात आलेय. श्रीलंकेनं आजच्या सामन्यात अकिला धनंजय याला संघाबाहेर बसलण्यात आलेय.

IND vs SL
Vinesh Phogat : रात्रभर व्यायाम, चक्कर येऊन पडली, विनेश फोगाटची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

निर्णयाक सामना कोण जिंकणार -

भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आर. प्रेमदासा स्टेडियमवर तीन सामन्याची वनडे मालिका सुरु आहे.यामध्ये श्रीलंका संघ १-० ने आघाडीवर आहे. पहिला सामना बरोबरीत सुटला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. त्याचा फटका टीम इंडियाला बसला. रोहित शर्माचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्माने दोन्ही सामन्यात अर्धशतके ठोकत सामना एकहाती फिरवला होता. पण रोहित शर्मा तंबूत परतल्यानंतर भारतीय संघाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. परिणामी भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. आज अखेरचा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडण्याचे आव्हान टीम इंडियासमोर असेल. त्यामुळेच रोहित शर्माने आफला हुकमी एक्का मैदानात उतरवला आहे. ऋषभ पंत आज खेळताना दिसणार आहे. दोन वर्षानंतर ऋषभ पंत वनडे सामना खेळताना दिसणार आहे.

टीम इंडियाची प्लेईंग ११ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रियान पराग, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

श्रीलंकेच्या ताफ्यात कोण कोणते शिलेदार -

अविष्का फर्नांडो, पथुम निसंका, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका (कर्णधार), जनिथ लियानागे, कामिंदु मेंडिस, डुनिथ वेलालगे, महीश तीक्ष्णा, जेफरी वेंडरसे, असिथा फर्नांडो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com