England Test Match Series Against West Indies: Getty Images
Sports

England Team: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

England Test Match Series Against West Indies: इंग्लंड संघ 10 जुलैपासून घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यासाठी पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आलीय.

Bharat Jadhav

T20 विश्वचषक संपल्यानंतर आता सर्व संघ पुन्हा द्विपक्षीय मालिका खेळताना दिसणार आहेत. इंग्लंडचा संघ 10 जुलैपासून घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या संदर्भात, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी 14 सदस्यीय संघाची घोषणा केलीय. या मालिकेतील पहिला सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे.

दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामनाही असेल. वेस्ट इंडिजविरुद्ध जाहीर झालेल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी काही वरिष्ठ खेळाडूंना संघात स्थान मिळालेले नाहीये. तर एका अनकॅप्ड खेळाडूचा समावेश करण्यात आलाय.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडने घोषित केलेल्या संघात यष्टीरक्षक आणि फलंदाज जॉनी बेअरस्टो आणि बेन फॉक्स यांचा संघात समावेश करण्यात आलेला नाहीये. तर प्रदीर्घ कालावधीनंतर वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे.

इंग्लंडकडून आतापर्यंत 2 एकदिवसीय सामने खेळलेला जिमी स्मिथ आणि अनकॅप्ड खेळाडू पेनिंग्टन यांना स्थान मिळालंय. या मालिकेतील पहिला सामना 10 जुलैपासून लॉर्ड्सच्या मैदानावर होणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 18 जुलैपासून सुरू होईल हा सामना नॉटिंगहॅमच्या मैदानावर होईल. तर मालिकेतील तिसरा कसोटी सामना 26 जुलैपासून बर्मिंगहॅमच्या मैदानावर खेळवला जाईल.

जेम्स अँडरसन जग विख्यात ख्याती असलेल्या वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. अँडरसन वेस्ट इंडिजविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटी सामने खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकणार आहे. या अशाप्रसंगी कर्णधार बेन स्टोक्स त्याला विजयासह भव्य आणि विस्मयकारक निरोप देण्याचा प्रयत्नात असेल. अँडरसनने 187 कसोटी सामने खेळताना 700 बळी घेतलेत. यात त्याने 32 वेळा एका डावात 5 विकेट घेतल्या आहेत. इंग्लंड संघ सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. यात इंग्लंडने 10 कसोटी सामने खेळत केवळ 3 मलिका जिंकल्यात, तर त्यांच्या गुणांची टक्केवारी 17.5 आहे.

इंग्लंड संघ:

बेन स्टोक्स (कर्णधार), जो रूट, डिलन पेनिंग्टन, ऑली पोप, जेम्स अँडरसन (फक्त पहिली कसोटी), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, मॅथ्यू पॉट्स, जेमी स्मिथ.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT