IND vs ENG: धरमशालेत इंग्लंडचं 'पानीपत'; टीम इंडियाने ६४ धावांनी जिंकला ५ वा कसोटी सामना

IND vs ENG: धरमशाला कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचं पाणीपत झालंय. टीम इंडियाने एक डाव आणि ६४ धावा राखत विजय मिळवला. या विजयासह भारताने एक नवा विक्रम केलाय.
IND vs ENG
IND vs ENGSaam Tv
Published On

IND vs ENG 5 Th Test Match Team India Won :

धरमशाला येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवलाय. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताने एक डाव आणि ६४ धावांनी विजय मिळवला. भारताने याआधीच मालिका जिंकली होती. आता टीम इंडियाने हा सामना जिंकून आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.(Latest News)

भारताचा (Team India) इंग्लंडविरुद्धचा विजय हा सर्वात मोठा विजय ठरला. या सामन्याच्या पहिल्या डावात फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ४ बळी घेतले. आता सामन्याच्या दुसऱ्या डावातही या खेळाडूंनी जबरदस्त गोलंदाजी केली. भारतीय फिरकी गोलंदाज अश्विन त्याच्या करिअरमधील १०० वा कसोटी सामना (Test Match) खेळत होता. या सामन्यात त्याने कमालीची गोलंदाजी केली. गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमुळे भारताने विजय मिळवला आणि नवा विक्रम केला.

५ कसोटी मालिकेतील पहिला सामना पराभूत झाल्यानंतर पुढील सर्व सामने जिंकण्याची किमया ही ११२ वर्षांनी घडलीय. भारताने ११२ वर्षांनंतर या इतिहासाची पुनरावृत्ती केलीय. १९१२ मध्ये इंग्लंड हा कारनामा केला होता. इंग्लंडने हा कारनामा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत केला होता.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान आज झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या (England) संघाने भारतीय गोलंदाजापुढे नांगी टाकली होती. टीम इंडियाने सीरिजमध्ये ४-१ अशी आघाडी घेऊन टेस्ट मालिका जिंकलीय. या सामन्यात टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना ४७७ धावा केल्या. २५९ धावांची आघाडी घेतली. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यास इंग्लंडचे फलंदाज अपयशी ठरले.

इंग्लंडकडून जो रूटने ८४ धावा केल्या. त्याच्याशिवाय कोणत्याच फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही. या सामन्यात भारताकडून १०० वी कसोटी खेळणारा गोलंदाज आर. अश्विनने तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या तब्बल ५ विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

IND vs ENG
IND vs ENG 5th Test Record: IND vs ENG कसोटी मालिका ठरली ऐतिहासिक! १४८ वर्षांत पहिल्यांदाच मारले गेले इतके षटकार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com