WTC Points Table saam tv
Sports

गुवाहाटी टेस्टमधील पराभव जिव्हारी लागणार, WTC Points Table मध्ये पाकिस्तानच्या खाली जाणार भारत, पाहा समीकरण

Guwahati Test defeat India WTC points table: गुवाहाटी कसोटी सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो. यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) २०२५-२०२७ च्या गुणतालिकेवर याचे गंभीर परिणाम होतील.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या गुवाहाटीच्या मैदानावर भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सामना सुरु आहे. या सामन्यात देखील टीम इंडियाची परिस्थिती फारच बिकट दिसून येतेय. कोलकात्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाकडून चांगल्या खेळाची अपेक्षा होती. मात्र या सामन्यतही फलंदाजांकडून पुन्हा निराशाच हाती आलीये. गुवाहाटी टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर तब्बल 549 रन्सचं लक्ष्य ठेवलंय.

चौथ्या दिवसाच्या अखेरीस परिस्थिती आणखी वाईट झाली कारण भारताचे दोन्ही ओपनर स्वस्तात बाद झाले. स्कोअरबोर्डवर फक्त 27 रन्स असताना यशस्वी जैयस्वाल आणि के.एल. राहुल पॅव्हेलियनमध्ये परतले. अशा स्थितीत गुवाहाटीत भारताचा पराभव जवळजवळ निश्चित मानला जातोय.

WTC पॉइंट्स टेबलवर भारताची होणार घसरण

जर भारत आजची गुवाहाटी टेस्टही हरला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. दोन वेळा WTC रनर-अप राहिलेल्या भारताचे सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचण्याचं स्वप्न भंग होण्याची शक्यता असते. कोलकाता टेस्ट हरल्यानंतर भारताला मोठा फटका बसला होता. सध्या भारत WTC पॉइंट्स टेबलवर चौथ्या स्थानावर आहे. या सायकलमध्ये भारताने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत, ज्यात 4 विजय आणि 3 पराभव झाले आहेत.

गुवाहाटीत जर टीम इंडियाचा पराभव झाला तर...?

WTC सिझनमध्ये भारत गुवाहाटीत 9वा सामना खेळतोय. जर हा सामना भारत हरला तर 9 पैकी 4 सामन्यांमध्ये भारत पराभूत असेल. यामुळे विनिंग परसेंटेज 50 वर येईल. पाकिस्तानने या सिझनमध्ये आतापर्यंत 2 सामने खेळले असून त्यांचं विनिंग परसेंटेज 50 आहे. अशा स्थितीत भारत गुवाहाटीत हरला तर तो पाकिस्तानपेक्षा खाली घसरणार आहे.

WTC मध्ये पॉईंट्स कसे दिले जातात?

  • जिंकण्यासाठी 12 पॉईंट्स- प्रत्येक टेस्ट जिंकल्यावर 12 गुण मिळतात.

  • बरोबरीसाठी 4 पॉईंटस: सामना ड्रॉ झाल्यास दोन्ही संघांना 4 पॉईंट्स मिळतात.

  • टायसाठी 6 पॉईंट्स: सामना टाय झाल्यास दोन्ही संघांना 6-6 पॉईंट्स दिले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Famous Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, VIDEO होतोय व्हायरल

Raj Thackeray: 'यांना मुंबई हे नाव खटकतंय...' केंद्रीय मंत्र्याला राज ठाकरेंनी झापलं

Guru Gochar 2025: पुढच्या वर्षी या राशींवर गुरुची राहणार कृपा; अडकलेला पैसा आणि नवी नोकरीही मिळू शकते

Pune News: पुण्यात बिबट्यानंतर माकडांची दहशत, सोसायटीत माकडांची घुसखोरी

SCROLL FOR NEXT