Gautam Gambhir: रवी शास्त्रीने गौतम गंभीरला घेतले फैलावर, मनमानी कारभारामुळे सुनावले खडे बोल

Ravi Shastri on Gautam Gambhir: भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा दोन माजी दिग्गजांमध्ये शाब्दिक युद्ध पेटलंय. माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी नुकतंच गौतम गंभीरच्या मनमानी व्यवस्थापनावर थेट बोट ठेवत त्याला कठोर शब्दांत सुनावलंय.
Ravi Shastri on Gautam Gambhir
Ravi Shastri on Gautam Gambhirsaam tv
Published On

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दुसरा टेस्ट सामना गुवाहाटीमध्ये खेळवण्यात येतोय. या सामन्यातही टीम इंडियावर पराभवाचं सावट आहे. टीम इंडियाच्या या परिस्थितीला अनेकजणांनी कोच गौतम गंभीरला जबाबदार मानलंय. ज्यावेळी रवि शास्त्री टीम इंडियाचे हेड कोच होते तेव्हा गौतम गंभीर त्यांच्यावर सतत टीका करत होा. आता वेळेचं चक्र फिरलंय. गंभीर हेड कोचच्या भूमिकेत आहेत आणि यावेळी शास्त्रींनी त्याच्यावर टीकेची झोड उठवलीये.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टेस्टमध्येही टीम इंडियाची अवस्था बिकट आहे. कोलकात्यात पराभव झाल्यानंतर आता गुवाहाटीतही पराभवाची टांगती तलवार दिसून येतेय. तिसऱ्या दिवशी भारत फक्त 201 रन्सवर ऑलआउट झाला. या सामन्याच्या पहिल्या डावातही फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. त्याच्या या खराब कामगिरीनंतर शास्त्रींनी हेड कोच गंभीरच्या काही निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

गौतम गंभीरवर संतापले रवी शास्त्री

भारताचे माजी क्रिकेटपटू रवि शास्त्री यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टेस्टमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये केलेल्या बदलांबाबत गंभीरवर टीका केलीये. कोलकाता टेस्टमध्ये पराभवानंतर टीम मॅनेजमेंटने साई सुदर्शन आणि नीतीश कुमार रेड्डी यांना टीममध्ये स्थान दिलं. या बदलांमुळे बॅटींग ऑर्डर मजबूत होईल अशी अपेक्षा होती. मात्र तसं न होता गुवाहाटी टेस्टच्या पहिल्या डावात भारत फक्त 201 रन्सवर गारद झाला.

Ravi Shastri on Gautam Gambhir
IND vs SA: आफ्रिकेच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय फलंदाज ढेर, तब्बल २८८ रन्सने पिछाडीवर, यान्सनची अष्टपैलू खेळी

साई सुदर्शनला टीममध्ये संधी दिल्याने बॅटींग ऑर्डरमध्ये बदल करावा लागला आणि ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर पहिल्या डावात आठव्या क्रमांकावर वर उतरावं लागलं. यानंतर शास्त्री म्हणाले की, भारताची फलंदाजी रणनीती त्यांच्या समजण्याच्या पलिकडे आहे.

काय म्हणाले रवी शास्त्री?

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर शास्त्री म्हणाले, “याचा काही अर्थच नाही. मला यामागे नेमका काय विचार केलाय हेच समजत नाहीये. गेल्या काही सिरीजपासून टीम मॅनेजमेंट फलंदाजी क्रमासोबत जे बदल करतोय त्यामुळे मी पूर्णपणे हैराण आहे. कोलकात्यात एका सुंदरने फक्त एक ओव्हर टाकली होती. अशावेळी तुम्ही दुसऱ्या चांगल्या फलंदाजाला संधी देऊ शकत होता.

Ravi Shastri on Gautam Gambhir
Ind vs SA Test : भारतावर पराभवाचं सावट; 'शेर' का होताहेत ढेर? 'गंभीर' कारणं

वॉशिंग्टनने कोलकाता टेस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती आणि आता तुमच्याकडे तिसऱ्या क्रमांकासाठी फलंदाज असताना तो सहज चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकला असता. तो आठव्या क्रमांकावर फलंदाजी करणं योग्य नाही, असंही शास्त्री म्हणालेत.

गुवाहाटी टेस्टच्या पहिल्या डावात बहुतेक भारतीय फलंदाज आफ्रिकन गोलंदाजांसमोर टिकू शकत नव्हते. मात्र अशा परिस्थितीत वॉशिंग्टन सुंदरने 92 चेंडूंवर 48 रन्सची खेळी केली.

Ravi Shastri on Gautam Gambhir
Smriti Mandhana: स्मृती मानधना-पलाशचं लग्न का पुढे ढकललं? कधी होणार लगीन? मुच्छलच्या बहिणीचा मोठा खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com