Smriti Mandhana: स्मृती मानधना-पलाशचं लग्न का पुढे ढकललं? कधी होणार लगीन? मुच्छलच्या बहिणीचा मोठा खुलासा

Smriti Mandhana Palash Wedding : पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना यांचे लग्न २३ नोव्हेंबर रोजी होणार होतं. परंतु क्रिकेटपटूच्या वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. आता पलाशची बहीण आणि गायिका पलक मुच्छल यांनी एक पोस्ट शेअर करत जनतेला एक खास विनंती केलीय.
Smriti Mandhana Palash Wedding
Smriti Mandhana and Palash Muccchal postpone their wedding after a health emergency; Palak Muccchal urges fans not to believe rumours.saam tv
Published On
Summary
  • स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आलाय.

  • पलक मुच्छल यांनी अफवा न पसरवण्याची विनंती केली आहे.

  • लग्न पुढे ढकलल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबद्दल तर्क-वितर्क काढले जात आहेत.

भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू स्मृती मानधना सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. गेल्या वर्षी स्मृतीने संगीतकार पलाश मुच्छलसोबतच्या नाते तिने जाहीर केले होते. रविवारी २३ नोव्हेंबर रोजी दे दोघेही लग्न करणार होते. परंतु स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. त्यानंतर तेव्हापासून त्यांच्या नात्याबद्दल अनेक अटकळ बांधली जात आहेत. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांची भेट एका कार्यक्रमात झाली होती, त्यानंतर त्यांची मैत्री झाली ती मैत्री हळूहळू प्रेमात रूपांतरित झाली.

Smriti Mandhana Palash Wedding
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या लग्नात विघ्न; वडिलांच्या पाठोपाठ होणाऱ्या नवऱ्याची प्रकृती बिघडली

स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृती स्वस्थ नसल्यानं लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. स्मृतीने तिच्या सोशल मीडियावरून लग्नाचे सर्व फोटो काढून टाकले आहेत. त्यामुळे वेगळ्याचं चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान आता पलाशची बहीम पलक मुच्छलनं सोशल मीडिया पोस्ट केलीय. पलक मुच्छलने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर ही स्टोरी शेअर केली आहे यात स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे पलाशचे लग्न सध्यासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. या कठीण काळात कुटुंबाच्या प्रायव्हसीचा आदर करावा अशी सर्वांना विनंती तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.”

Smriti Mandhana Palash Wedding
Smriti Mandhana Wedding: स्मृती मानधनाने घेतला मोठा निर्णय, लग्नाशी संबंधित सर्व पोस्ट डिलीट

पलकने अलिकडच्या काळात स्मृतीसोबतचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या अकाउंटवर पलाश आणि स्मृतीच्या लग्नाच्या आधीच्या विधीचे काही फोटो दिसत आहेत. दरम्यान लग्नाच्या पुढील तारखेबद्दल कोणतीही माहिती उघड झालेली नाहीये. मात्र गेल्या काही दिवसांपासून पलाश आणि स्मृतीची चर्चा सोशल मीडियावर होतेय. पलाशने क्रिकेटच्या मैदानावर स्मृतीला प्रपोज केले होते. याचा व्हिडिओ दोघांच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com