Smriti Mandhana Wedding: स्मृती मानधनाने घेतला मोठा निर्णय, लग्नाशी संबंधित सर्व पोस्ट डिलीट

Smriti Mandhana Father Health Update: स्मृती मानधनाच्या वडिलांना हार्ट अटॅक आला. त्यामुळे तिचे लग्न स्थगित करण्यात आले. वडिलांची प्रकृती बिघडल्यानंतर स्मृती मानधनाने मोठा निर्णय घेतला. स्मृतीने तिच्या इन्स्टाग्रामवरील लग्नाशीसंबंधित सर्व पोस्ट डिलीट केल्या.
Smriti Mandhana Wedding: स्मृती मानधनाने घेतला मोठा निर्णय, लग्नाशी संबंधित सर्व पोस्ट डिलीट
Smriti Mandhana WeddingSaam Tv
Published On

Summary -

  • स्मृती मानधनाने लग्नाबाबत मोठा निर्णय घेतला

  • वडिलांची प्रकृती बिघडल्यानंतर स्मृतीचे लग्न स्थगित करण्यात आले

  • जोपर्यंत वडील पूर्णपणे बरे होत नाही तोपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय स्मृतीने घेतला

  • स्मृतीने इन्स्टाग्रामवरून लग्नाशीसंबंधित सर्व पोस्ट डिलीट केल्या

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाच्या लग्नाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. स्मृती मानधनाने लग्नाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत वडिलांची तब्येत पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय स्मृतीने घेतला आहे. स्मृतीचे मॅनेजर तोहिन मिश्रा यांनी ही माहिती दिली. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे रविवारी लग्न होणार होते. पण लग्नसोहळा सुरू असताना स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आला. त्यांच्यावर सध्या सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे स्मृती मानधनाचे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.

स्मृती मानधनाचे सांगलीमध्ये मोठ्या धुमधडाक्यात लग्न होणार होते. सायंकाळी साडेचार वाजता ती लग्नबंधनात अडकणार होती. पण लग्नाची तयारी सुरू असतानाच दुपारी दीड वाजताच्या सुमारास तिच्या वडिलांची प्रकृती खराब झाली. नाश्ता करताना त्यांना अस्वस्त वाटू लागले. त्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे रुग्णवाहिका बोलावण्यात आली. लग्नाच्या ठिकाणी रुग्णवाहिका आल्यामुळे एकच गोंधळ उडाला.

स्मृतीच्या वडिलांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांना माइल्ड हार्ट अटॅक आला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर एन्जिओप्लास्टि करण्यात येण्याची शक्यता आहे. वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर स्मृतीच्या लग्नाच्या ठिकाणावरून सर्व पाहुण्यांना परत पाठवण्यात आले. त्यानंतर लग्नाच्या ठिकाणावरून डेकोरेशन देखील काढण्यात आले. स्मृतीचे लग्न स्थगित करण्यात आले असल्याचे सर्वांना सांगण्यात आले.

Smriti Mandhana Wedding: स्मृती मानधनाने घेतला मोठा निर्णय, लग्नाशी संबंधित सर्व पोस्ट डिलीट
Smriti Mandhana Wedding: स्मृती मानधनाच्या वडिलांना हार्ट अटॅक, विवाहसोहळा रद्द

वडिलांची प्रकृती खराब झाल्यानंतर स्मृतीचा होणारा नवरा पलाशची देखील प्रकृती खराब झाली. त्याच्यावर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहे. वडिलांची प्रकृती खराब झाल्यामुळे स्मृतीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. ते सर्वजण रुग्णालयात आहेत. यासर्व घडामोडीनंतर आता स्मृती मानधनाने मोठा निर्णय घेतला. जोपर्यंत वडील पूर्णपणे बरे होत नाही तोपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय तिने घेतला.

Smriti Mandhana Wedding: स्मृती मानधनाने घेतला मोठा निर्णय, लग्नाशी संबंधित सर्व पोस्ट डिलीट
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या लग्नात विघ्न; वडिलांच्या पाठोपाठ होणाऱ्या नवऱ्याची प्रकृती बिघडली

त्याचोसबत स्मृतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लग्नाशी संबंधित सर्व फोटो आणि व्हिडीओ देखील डिलीट केले. स्मृतीने सारखपुड्याचे, संगीतमध्ये डान्स करातानाचे, मेहंदीचे फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले आहेत. त्यामुळे स्मृती आणि पलाश या दोघांचे चाहते देखील संभ्रमात पडले आहेत. आता या दोघांचे लग्न कधी होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Smriti Mandhana Wedding: स्मृती मानधनाने घेतला मोठा निर्णय, लग्नाशी संबंधित सर्व पोस्ट डिलीट
Smriti Mandhana Haldi : हळदीत रंगले स्मृती-पलाश; टीम इंडिया बेभान होऊन नाचली, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com