Smriti Mandhana Haldi : हळदीत रंगले स्मृती-पलाश; टीम इंडिया बेभान होऊन नाचली, पाहा VIDEO

Smriti Mandhana Palash Muchhal Haldi Ceremony Video : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलच्या हळदीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हळदीमधील खास क्षणांची झलक पाहा.
Smriti Mandhana Palash Muchhal Haldi Ceremony Video
Smriti Mandhana Haldi SAAM TV
Published On
Summary

स्मृती मानधनाच्या घरी लगीन घाई पाहायला मिळत आहे.

नुकताच स्मृती आणि पलाशचा हळदीचा कार्यक्रम पार पडला आहे.

हळदी समारंभाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

भारतीय क्रिकेट टीमची उपकर्णधार स्मृती मानधना लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्न सोहळ्यातील कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. टीम इंडियाने हळदी सोहळ्यात तुफान डान्स केला आहे. पलाश मुच्छलने हटके स्टाइलमध्ये स्मृती मानधनाला प्रपोज केले. त्यांच्या या क्यूट अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे.

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल हळदीत खूपच सुंदर दिसत होते. दोघांनी पिवळ्या रंगाचा आऊटफिट परिधान केला होता. सर्वजण त्यांना हळदी लावताना. त्यांच्यावर फुल उडवताना दिसत आहेत. स्मृतीने पिवळा चुडीदार ड्रेस आणि पलाशने पिवळ्या रंगाचा सदरा परिधान केला होता. हळदी सोहळ्यात स्मृती- पलाशचे खूप क्यूट क्षण टिपण्यात आले आहे. एका व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, स्मृती आणि पलाशवर पुष्पवर्षाव झाला. त्यांच्या डोक्यावर फुलांच्या पाकळ्या टाकल्या. त्यानंतर स्मृती आणि पलाश प्रेमाने एकमेकांच्या डोक्यावरून फुलांच्या पाकळ्या काढत होते.

तर दुसऱ्या एका व्हिडीओत हळदी समारंभात स्मृती मानधनाची एन्ट्री होताच. टीम इंडियाचा सदस्य बेभान होऊन नाचताना दिसले. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. यात जेमिमा रॉड्रीग्ज, शफाली वर्मा, अरूंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, राधा यादव, रेणुका सिंग ठाकूर, रिचा घोष यांचा समावेश होता. विवाह सोहळ्याच्या ठिकाणी रात्री शादी प्रीमियर लीग पार पडला. रात्री उशिरापर्यंत सर्वांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल अनेक काळापासून पलाश मुच्छलला डेट करत आहे. स्मृती मानधना इंदौरची सूनबाई होणार आहे. स्मृती आणि पलाशचे शाही लग्न सोहळा सांगली येथे पार पडणार आहे. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल 23 नोव्हेंबरला लग्न बंधनात अडकणार आहेत. चाहते स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलच्या लग्नासाठी खूपच उत्सुक आहेत.

Smriti Mandhana Palash Muchhal Haldi Ceremony Video
Prabhakar More : प्रभाकर मोरेला पहिल्या चित्रपटासाठी किती पैसे मिळाले? वाचा किस्सा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com