Surabhi Jayashree Jagdish
भारतीय महिला टीमची उपकर्णधार आणि सांगलीची कन्या स्मृती मानधनाचा 23 नोव्हेंबर रोजी विवाह पार पडणार आहे. सांगलीत विवाह सोहळा पार पडतोय धुमधडाक्यात हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे.
या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी मानधना कुटुंबाकडून करण्यात आलेली आहे. यावेळी लग्नसोहळ्यासाठी नवरदेव पलाश मुच्छल हे वऱ्हाड मंडळीसह सांगलीत दाखल झालेत.
यावेळी मानधना परिवाराकडून पलाशचं जंगी स्वागत देखील करण्यात आलं. या जंगी स्वागताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतोय.
स्मृतीने गुरुवारी तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. तिने पलाशसोबतची एंगेजमेंट झाल्याचं कन्फर्म केलं.
पलाशने आपल्या लेडी लव्हला प्रपोज करताना रोमँटिक व्हिडिओ शेअर केलाय. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, "...आणि तिने हो म्हटले."
धुमधडाक्यात होणाऱ्या या लग्न सोहळ्यासाठी क्रिकेट क्षेत्रासह विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थिती लावतील, अशी माहिती आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा होणार असल्याचं मानधना कुटुंबीयांकडून सांगण्यात येतंय.
स्मृती आणि पलाश २३ नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधणार आहेत. या कपलला नरेंद्र मोदींनीही खूप शुभेच्छा दिल्या आहेत.