IND vs SA: आफ्रिकेच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय फलंदाज ढेर, तब्बल २८८ रन्सने पिछाडीवर, यान्सनची अष्टपैलू खेळी

IND vs SA: गुवाहाटीमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा २०१ रन्सवर ऑलआऊट झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने फॉलो ऑन दिला नसून त्यांच्याकडे २८८ रन्सची आघाडी आहे.
IND vs SA
IND vs SAsaam tv
Published On

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दुसरा टेस्ट सामना गुवाहाटीमध्ये खेळवण्यात येतोय. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना ४८९ रन्स केले होते. तर टीम इंडिया पहिल्याच डावात २०१ रन्सवर माघारी परतलीये. टीम इंडियाची परिस्थिती इतकी बिकट झाली की फॉलो ऑन देखील लागला असता. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या टीमने फॉलो ऑन न देण्याचा निर्णय घेतला आहे.

यान्सनेच्या गोलंदाजीसमोर टीम इंडिया ढेपाळली

दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज मार्को यान्सेन याने या डावात ६ विकेट्स घेतले. याशिवाय फलंदाजीमध्येही त्याने ९३ रन्सची मोठी खेळी केली होती. टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक म्हणजे ५८ रन्सची खेळी केली. टीम इंडियाचा ऑल आऊट झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडे २८८ रन्सची आघाडी आहे.

IND vs SA
IND vs SA: गुवाहाटी टेस्टसाठी ऋषभ पंत कर्णधार; गिलची जागा कोण घेणार? पाहा संभाव्य प्लेईंग ११

ऋषभ पंतच्या नेतृ्त्वाखाली टीम इंडियाकडे ही टेस्ट सिरीज ड्रॉ करण्याची संधी होती. मात्र टीम इंडियाच्या फलंदाजांना चांगला खेळ करता आला नाही. टीम इंडियाला या सिरीजच्या पहिल्या टेस्टमध्ये ३० रन्सने सामना गमवावा लागला होता.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने फॉलो-ऑन लागू न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे दक्षिण आफ्रिकेटी टीम पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत. भारताकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ५८ रन्स केले, तर सुंदरने ४८ रन्स केले. याशिवाय इतर फलंदाज कामगिरी करू शकले नाहीत.

IND vs SA
Australia vs England, 1st Test : कसोटीत १०४ वर्षांनी चमत्कार, दुसऱ्याच दिवशी तगड्या इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाकडून सुपडासाफ

केएल राहुलने २२ रन्स, साई सुदर्शनने १५ रन्स, कर्णधार ऋषभ पंतने सात रन्स, रवींद्र जडेजा सहा रन्स आणि नितीश रेड्डीने १० रन्स केले आहेत. ९५ धावांवर एक विकेट बाद झाल्यानंतर भारताने १२२ रन्सपर्यंत पोहोचण्यापूर्वी सात विकेट गमावल्या. ध्रुव जुरेलला या डावात भोपळाही फोडता आला नाही.

IND vs SA
Team India Announcement: टीम इंडियाचा कर्णधार बदलला; ODI सीरिजसाठी नव्या संघाची घोषणा

सुंदर-कुलदीपचा पार्टनरशिप

सुंदरने कुलदीप यादवसोबत ७२ रन्सची भागीदारी केली. सुंदरच्या बाद झाल्यामुळे टीमची धावसंख्या २०१ पर्यंत पोहोचण्यास मदत मिळाली आहे. कुलदीप १९ धावांवर बाद झाला, तर बुमराह पाच धावांवर बाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून जानसेनने सहा, तर सायमन हार्मरने तीन विकेट्स घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com