Australia vs England, 1st Test : कसोटीत १०४ वर्षांनी चमत्कार, दुसऱ्याच दिवशी तगड्या इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाकडून सुपडासाफ

ashes series 2025, Aus vs Eng Test : अॅशेस मालिकेच्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियानं तगड्या इंग्लंडला पराभूत केलं. विशेष म्हणजे हा विजय कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच मिळालाय. १९२१ नंतर पहिल्यांदाच अॅशेस मालिकेत हा चमत्कार घडलाय. ऑस्ट्रेलियानं या मालिकेत १-० ने आघाडी घेतलीय.
अॅशेस कसोटी मालिकेच्या इतिहासात १०४ वर्षांनी घडला चमत्कार, दोनच दिवसांत सामना आटोपला
pat cummins and ben stokes in ashes test seriessocial media
Published On
Summary
  • अॅशेस मालिकेत १०४ वर्षांनी घडला चमत्कार

  • दोनच दिवसांत कसोटी सामना संपला

  • ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय

अॅशेस मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियानं तितक्यात तगड्या इंग्लंडवर आठ विकेट राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाकडून तेजतर्रार बॉलर मिचेल स्टार्क यानं खोचक मारा केला. या कसोटीत त्यानं तब्बल १० विकेट घेतल्या. ट्रेविस हेडनं तर कसोटीतही टी-२० सारखं शतक तडकावलं. इंग्लंडच्या फलंदाजांना खोचक माऱ्यापुढं नाचायला लावणाऱ्या बॉलरचा दबदबा या कसोटीत दिसत असताना हेडनं शानदार-जबरदस्त खेळी करून ऐतिहासिक विजयात मोलाचा वाटा उचलला.

कसोटी सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी इंग्लंडला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. अॅशेस मालिकेतील कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांतच संपला. याआधी सन १९२१ म्हणजे तब्बल १०४ वर्षांपूर्वी इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना दोन दिवसांत संपला होता.

हेडची टी २० स्टाइल तडाखेबंद बॅटिंग

ऑस्ट्रेलियाला पहिल्या कसोटी सामन्यात विजयासाठी २०५ धावांचं आव्हान मिळालं होतं. ट्रेविस हेडच्या तडाखेबंद शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं हे आव्हान लिलया पार केलं. हेडनं अवघ्या ८३ चेंडूंत १२३ धावा कुटल्या. त्यात १६ सणसणीत चौकार आणि चार खणखणीत चौकार होते. मार्नस लाबुशेननं ५१ धावा केल्या. जेक वदराल्ड यानं २३ धावांचं योगदान दिलं. या फलंदाजांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर दुसऱ्याच दिवशी कसोटी सामना संपला. दुसऱ्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांना काही विशेष कामगिरी करता आली नाही.

अॅशेस कसोटी मालिकेच्या इतिहासात १०४ वर्षांनी घडला चमत्कार, दोनच दिवसांत सामना आटोपला
Ind vs Aus : टी २० मध्ये भारतच किंग! ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात जाऊन नमवलं, मालिका २-१ ने जिंकली

पहिल्या डावामुळं इंग्लंड होता आघाडीवर, पण...

अॅशेस मालिकेच्या पहिल्याच कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडनं १७२ धावा केल्या होत्या. हॅरी ब्रुकने दमदार ५२ धावांची खेळी केली. पण इतर फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या स्टार्क एक्स्प्रेससमोर सपशेल गुडघे टेकले. पहिल्याच डावात स्टार्क यानं इंग्लंडच्या सात फलंदाजांना माघारी पाठवले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे फलंदाजही ढेपाळले. त्यांना फक्त १३२ धावाच करता आल्या होत्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्स यानं सर्वाधिक पाच विकेट घेतल्या होत्या. ब्रायडन कार्से यानं तीन विकेट घेतल्या. पहिल्या डावात केलेल्या धावांच्या जोरावर इंग्लंडला ४० धावांची आघाडी मिळाली होती.

अॅशेस कसोटी मालिकेच्या इतिहासात १०४ वर्षांनी घडला चमत्कार, दोनच दिवसांत सामना आटोपला
Rohit Sharma : पुन्हा कर्णधारपदाची चर्चा सुरू असतानाच रोहित शर्माला आणखी एक धक्का

दोन दिवसांतच सामना आटोपला

पहिल्या डावात साजेशी कामगिरी न केलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांकडून दुसऱ्या डावात प्रचंड आशा होत्या. पण तिथंही इंग्लंड जणू या कसोटीत पराभूत मानसिकतेने उतरलेत असेच वाटत होते. खरं तर झालंही तसंच. इंग्लंडचा दुसरा डाव १६४ धावांवर आटोपला. ४० धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावात केलेल्या १६४ धावा असे एकूण २०५ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर होतं. पण हेडच्या दे दणादण खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं आठ गडी राखून विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com