ICC कडून टी20 विश्वचषकाचे शेड्युल जाहीर; भारत-पाकिस्तानचा पहिला सामना कधी?

ICC T20 World cup : आयसीसीने विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या स्पर्धेत भारत-पाकिस्तान एकमेकांशी भिडताना दिसणार आहे.
India vs Pakistan cricket match News
India vs Pakistan cricket Saam tv
Published On
Summary

टी20 क्रिकेट वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर

भारत आणि श्रीलंकेकडे संयुक्त यजमानपद

स्पर्धेत एकूण 55 सामने होणार

भारत आणि पाकिस्तान एकाच गटात

आयसीसीने 2026 मध्ये होणाऱ्या पुरुष टी20 क्रिकेट वर्ल्डकपचं वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आलं आहे. भारत आणि श्रीलंका या संयुक्त यजमान देशांमध्ये 7 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 या कालावधीत हा मोठा क्रिकेट सोहळा पार पडणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ असणार आहेत, तर 55 सामन्यांची रंजक लढत जवळपास एका महिन्यापर्यंत रंगणार आहे. या स्पर्धेत भारत-पाकिस्तान हे दोन्ही पारंपरिक संघ भिडताना पाहायला मिळेल.

वर्ल्डकपमधील सर्व संघांची 4 गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. उद्घाटन दिवशी तीन सामने आयोजित करण्यात आले आहेत.

पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड – सकाळी 11 वाजता, कोलंबो

दुसरा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश – दुपारी 3 वाजता, कोलकाता

तिसरा सामना भारत विरुद्ध युएई – रात्री 7 वाजता, मुंबई

भारतात दहा वर्षांनंतर टी20 वर्ल्डकप

India vs Pakistan cricket match News
Maharashtra Politics : काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी बडा नेता भाजपच्या गळाला

2016 नंतर पहिल्यांदाच भारतीय चाहत्यांना घरच्या मैदानावर टी20 विश्वचषकाची मजा अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे, रोहित शर्मा खेळाडू म्हणून या स्पर्धेत दिसणार नसला तरी आयसीसीने त्याची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. मागील सर्व टी20 विश्वचषकांमध्ये रोहित खेळाडू म्हणून सहभागी होता. त्यामुळे हा बदल विशेष चर्चेत आहे.

8 शहरांमध्ये भव्य स्पर्धा

स्पर्धेतील सामने दोन्ही देशांतील एकूण 8 ठिकाणी खेळले जातील. भारतात दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद या ठिकाणी सामने खेळवले जातील. श्रीलंकेत कोलंबो, कँडीसहित आणखी एक ठिकाणी सामने खेळवले जाणार आहेत. मुंबईत एकूण ८ सामने होणार आहेत.

India vs Pakistan cricket match News
धनंजय मुंडेंना 'कराड'ची ओढ? कराडच्या आठवणीनं मुंडे व्याकूळ, VIDEO

या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

ग्रुप A: हिंदुस्थान, पाकिस्तान, यूएसए, नेदरलँड, नामिबिया

ग्रुप B: ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिंबाब्वे, ओमान

ग्रुप C: इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, नेपाळ, इटली

ग्रुप D: न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा, यूएई

India vs Pakistan cricket match News
Shocking : लग्नाला सुट्टी मिळाली नाही; लग्नाच्या एक दिवसाआधी ऑडिटरने आयुष्य संपवलं

भारतीय संघाचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला मुंबईत युएईविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी नामिबिया विरुद्ध दिल्लीत होईल. 15 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान विरुद्ध सामना हा कोलंबोमध्ये होईल. तर 18 फेब्रुवारी रोजी नेदरलँड विरुद्ध सामना हा अहमदाबाद येथे होईल.

मुंबईत सामने कधी?

7 फेब्रुवारी : भारत विरूद्ध अमेरिका, संध्यांकांळी ७ वाजता

८ फेब्रुवारी : इंग्लंड विरूद्ध नेपाळ, दुपारी ३

११ फेब्रुवारी : इंग्लंड विरूद्ध वेस्ट इंडिज, ७ संध्याकांळी

१२ फेब्रुवारी : नेपाळ विरूद्ध इटली, दुपारी ३

१५ फ्रेबुवारी : वेस्ट इंडिज विरूद्ध नेपाळ, सकाळी ११

१७ फेब्रुवारी : बांगलादेश विरूद्ध नेपाळ , संध्याकाळी ७

२३ फेब्रुवारी : संध्याकाळी ७ वाजता

५ मार्च : संध्याकाळी ७ वाजता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com