धनंजय मुंडेंना 'कराड'ची ओढ? कराडच्या आठवणीनं मुंडे व्याकूळ, VIDEO

Dhananjay munde and Walmik Karad news : धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची ओढ लागलीय... असं आम्ही का म्हणतोय... मुंडेंच्या कोणत्या विधानानं राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालाय... मुंडे आणि कराड कनेक्शन कसं समोर आलयं... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....
Dhananjay Munde and  Walmik Karad news
Dhananjay munde and Walmik KaradSaam tv
Published On

परळीतील धनंजय मुंडेंच्या प्रचारसभेतील याचं विधानानं राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलयं...ज्या कराडमुळेच मुंडेंचं मंत्रिपद गेलं. त्याच कराडची मुंडेंनी पुन्हा आठवण काढल्याने एकच खळबळ उडालीय...मुंडे नेमकं काय म्हणाले ऐका...

दुसरीकडे हत्या प्रकरणातील आरोपी असणाऱ्या कराडची आठवण काढल्यानं मुंडे माणूस म्हण्याच्या योग्यतेचे नाहीत, असा प्रहार दमानियांनी केलाय... तर जरांगेंनीही मुंडेविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय..

Dhananjay Munde and  Walmik Karad news
BMC Election : महापालिकेची ही शेवटची निवडणूक, हातातून मुंबई गेली तर...; राज ठाकरे स्पष्टच बोलले, VIDEO

महिन्याभरापूर्वी पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर झळकल्यानं मुंडेंच्या मेळाव्यात कराडचं समर्थन करणारे नेमके कोण आहेत? असा सवाल निर्माण झाला होता... मात्र धनंजय मुंडेंनी प्रचार सभेत वाल्मिक कराडची उणीव भासत असल्याचं सूचक विधान केल्यानं आता वाद निर्माण झालाय...

Dhananjay Munde and  Walmik Karad news
प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; घरातील जवळच्या व्यक्तीचं निधन

मंत्रीपदाचा राजीनामा देण्याआधी कराडशी संबंध नसल्याचं सांगणाऱ्या मुंडेंनी प्रचारसभेत नेमकं कोणत्या उद्देशानं कराडची आठवण काढली? संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला सुरु असताना मुंडेंच्या या विधानानं त्याच्या अडचणी आणखी वाढणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com