प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; घरातील जवळच्या व्यक्तीचं निधन

Adah Sharma Grand Mother Death: प्रसिद्ध अभिनेत्री अदावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अदाच्या घरातील जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे.
Adah Sharma
Adah Sharma Grand Mother Death:Saam tv
Published On
Summary

अदा शर्माच्या आजीचं निधन

महिनाभरापासून रुग्णालयात घेत होत्या उपचार

आजीने रविवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला

Adah Sharma Grand Mother Death: सिनेसृष्टीतून एक दुखद घटना समोर आली आहे. 'द केरला स्टोरी'सहित अनेक प्रसिद्ध सिनेमात काम केलेल्या अदा शर्माच्या आजीचं निधन झालं आहे. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. मागील एका महिन्यांपासून त्यांना रुग्णालयात उपचार घेत होत्या. अदाच्या आजीने रविवारी सकाळी ५.३० वाजता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

आजीच्या निधनाने अदा शर्माला मोठा धक्का बसला आहे. अदाचं नानीशी चांगलं बॉन्डिंग होतं. अदा तिच्या आजीला 'Paati' म्हणून हाक मारायची. तिची आजी अदाच्या घरात राहायला होती.

Adah Sharma
Arnav Khaire : अर्णव खैरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; लोकलमध्ये मारहाण करणाऱ्या प्रवाशांवर गुन्हा दाखल

अदा शर्माने अनेकदा आजीसोबत फोटो शेअर केले आहेत. तिने काही दिवसांपूर्वी आजीचा वाढदिवस साजरा केला होता. तिने आजीसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट केली होती. अदाने कॅप्शनमध्ये म्हटलं होतं की, 'माझ्या गोड आजीचा वाढदिवस, Paatiसोबत बर्थडे पार्टी'.

Adah Sharma
Maharashtra Politics : ठाकरेंच्या जागेवर शिंदे-मनसे लढत; उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात मशाल पेटणार, इंजिन धावणार!

अदाने पुढे म्हटलं होतं की, 'माझ्या आजीच्या बर्थडे पार्टी मला सिनेमाटोग्राफर होण्याची संधी मिळाली. मला ही अभिमानाची बाब वाटत आहे.तसेच तिने काही फोटो देखील शेअर केले होते. अदा शर्माचं इंडस्ट्रीत मोठं नाव आहे. तिने काही हिट सिनेमे देऊन प्रचंड नाव कमावलं आहे.

Adah Sharma
लोकांच्या खऱ्या प्रश्नांना बगल; खान, पठाण, शेलार, शिंदे या नावांवर राजकारण; भाजप नेत्यांच्या आरोपावर असलम शेख काय म्हणाले?

अदा शर्माने २००८ साली '1920' या चित्रपटातून सिनेसृष्टीत डेब्यू केलं. तिने या सिनेमात लिसा सिंह राठोड नावाच्या पात्राची भूमिका साकारली होती. तिने हिंदी व्यतिरिक्त तेलुगु, कन्नड, तामिळ सिनेमातही काम केलं आहे. अदाने ओटीटीवर काम केलं आहे. अदा शर्माचा २०२३ साली 'द केरला स्टोरी' नावाचा सिनेमा आला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केलं होतं. या सिनेमाने बंपर कमाई केली होती. तर १५ कोटी बजेट असलेल्या सिनेमाने ३०२ कोटींची कमाई केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com