Arnav Khaire : अर्णव खैरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; लोकलमध्ये मारहाण करणाऱ्या प्रवाशांवर गुन्हा दाखल

arnav khaire : अर्णव खैरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मारहाण करणाऱ्या प्रवाशांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
arnav khaire News
arnav khaireSaam tv
Published On
Summary

अर्णव खैरे आत्महत्येप्रकरणी आता अज्ञात प्रवाशांविरुद्ध आत्महत्या प्रवृत्तीचा गुन्हा

लोकलमध्ये मारहाणीनंतर मानसिक तणावामुळे अर्णवची आत्महत्या

दोन स्वतंत्र तपास पथकांनी CCTV आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे शोधमोहीम सुरू

कल्याण-डोंबिवली परिसरात या प्रकरणामुळे मोठी खळबळ

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याणातील अर्णव खैरे आत्महत्येप्रकरणी महत्त्वाची घडामोड झाली आहे. प्रथमदर्शी पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला होता. पण आता लोकल ट्रेनमध्ये मारहाण करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध कल्याण पोलिसांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे पोलीस व स्थानिक पोलिसांच्या दोन स्वतंत्र तपास पथकांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अर्णव खैरे हा लोकल ट्रेनमध्ये प्रवास करत असताना, मराठी बोलता येत नाही का? या कारणावरून काही अज्ञात व्यक्तींनी त्याला बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर मानसिक तणाव वाढल्याने अर्णव यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी अर्णवला मारहाण केलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी दोन विशेष पथके तयार केली आहेत. रेल्वे पोलिसांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शी प्रवाशांची माहिती घेत तपासाचा वेग वाढविण्यात येत आहे.

arnav khaire News
तुमचं WhatsAPP कुणीतरी वाचतंय? लीक झालेल्या डेटात तुमचाही नंबर? VIDEO

या प्रकरणामुळे कल्याण-डोंबिवली परिसरात मोठी खळबळ उडाली असून, मारहाण करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला गती दिल्याने लवकरच आरोपींपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

arnav khaire News
Friday Horoscope : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना अडचणीवर मात करावी लागणार

खासदार श्रीकांत शिंदे यांचा पीडित कुटुंबीयांना फोनवरून दिलासा

कल्याणमध्ये लोकल ट्रेनमधील हिंदी–मराठी वादातून झालेल्या मारहाणीच्या धक्क्याने आत्महत्या केलेल्या १९ वर्षीय अर्णव खैरेच्या कुटुंबीयांची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी फोनवरून विचारपूस करत सांत्वन केलं. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे खैरे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या कठीण प्रसंगात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न खासदार शिंदे यांनी दाखवलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com