U19 Women T20 World Cup 2025: ICC महिला अंडर-19 टी20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर, टीम इंडियासमोर असेल 'या' संघांचे आव्हान

U19 महिला T20 विश्वचषक 2025 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय संघाला अ गटात ठेवण्यात आले आहे. ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक संघ प्रत्येकी तीन सामने खेळणार आहे.
U19 Women T20 World Cup 2025: ICC महिला अंडर-19 टी20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर, टीम इंडियासमोर असेल 'या' संघांचे आव्हान
Published On

ICC महिला अंडर-19 T20 विश्वचषक 2025 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही स्पर्धा मलेशियामध्ये खेळवली जाणार आहे. गेल्या मोसमात भारताने शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लंडला हरवून विजेतेपद पटकावले होते. आता पुढील वर्षी 18 जानेवारीपासून ही स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानच्या संघाला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ठेवण्यात आले आहे. भारतीय महिला संघ अ ग्रुपमध्ये असेल तर ब ग्रुपमध्ये पाकिस्तानच्या संघाला ठेवण्यात आले आहे.

महिला अंडर-19 T20 विश्वचषक 2025 मध्ये एकूण 16 संघ सहभागी होतील. या संघांना 4 ग्रुपमध्ये विभागण्यात आलंय. ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक संघ प्रत्येकी तीन सामने खेळणार आहेत. यानंतर प्रत्येक गटातील टॉप-3 संघ सुपर-6 सिक्ससाठी पात्र ठरतील. सुपर सिक्ससाठी संघांची दोन गटात विभागणी करण्यात आलीय. सुपर सिक्ससाठी संघांची दोन गटात विभागणी करण्यात आलीय. त्यापैकी चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील आणि त्यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल.

उपांत्य फेरीचे सामने 31 जानेवारीला होणार असून अंतिम सामना 2 फेब्रुवारीला होईल. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलाय. ग्रुप स्टेजमध्ये भारतीय संघाला वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि मलेशियाविरुद्ध सामने खेळायचे आहेत.

अ गट : भारत, वेस्ट इंडिज, श्रीलंका, मलेशिया

ब गट: इंग्लंड, पाकिस्तान, आयर्लंड, अमेरिका

गट क: न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, आफ्रिका पात्रता, सामोआ

गट ड: ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, आशिया पात्रता, स्कॉटलंड

U19 Women T20 World Cup 2025: ICC महिला अंडर-19 टी20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर, टीम इंडियासमोर असेल 'या' संघांचे आव्हान
Pro Govinda Final: प्रो गोविंदाची फायनल आज! विजेत्या, उपविजेत्यांवर पैशांचा पाऊस; किती रक्कम मिळणार?

U19 महिला T20 विश्व कप 2025 शेड्यूल:

18 जानेवारी: ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्कॉटलंड, सकाळी 10:30 am, UKM YSD ओव्हल

18 जानेवारी: इंग्लंड विरुद्ध आयर्लंड, सकाळी 10:30, JCA ओव्हल, जोहर

18 जानेवारी: समोआ विरुद्ध आफ्रिका पात्रता, सकाळी 10:30, सारवाक क्रिकेट ग्राउंड (SCG)

18 जानेवारी: बांगलादेश विरुद्ध आशिया पात्रता, दुपारी 2:30, UKM YSD ओव्हल

18 जानेवारी: पाकिस्तान विरुद्ध अमेरिका, दुपारी 2:30 वाजता, जेसीए ओव्हल, जोहर

18 जानेवारी: न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दुपारी 2:30 वाजता, सारवाक क्रिकेट ग्राउंड (SCG)

19 जानेवारी: श्रीलंका विरुद्ध मलेशिया, सकाळी 10:30, ब्युमास ओव्हल

जानेवारी, 19: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, दुपारी 2:30 वाजता, ब्युमास ओव्हल

20 जानेवारी: ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश, सकाळी 10:30, UKM YSD ओव्हल

20 जानेवारी: आयर्लंड विरुद्ध यूएसए, सकाळी 10:30, जेसीए ओव्हल, जोहर

20 जानेवारी: न्यूझीलंड विरुद्ध आफ्रिका क्वालिफायर, सकाळी 10:30, सारवाक क्रिकेट ग्राउंड (SCG)

20 जानेवारी: स्कॉटलंड वि एशिया क्वालिफायर, दुपारी 2:30, UKM YSD ओव्हल

20 जानेवारी: इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, दुपारी 2:30 वाजता, जेसीए ओव्हल, जोहर

20 जानेवारी: दक्षिण आफ्रिका विरुद्ध सामोआ, दुपारी 2:30 वाजता, सारवाक क्रिकेट ग्राउंड (SCG)

21 जानेवारी: वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका, सकाळी 10:30, ब्युमास ओव्हल

21 जानेवारी: भारत विरुद्ध मलेशिया, दुपारी 2:30 वाजता, ब्युमास ओव्हल

22 जानेवारी: इंग्लंड विरुद्ध यूएसए, सकाळी 10:30, जेसीए ओव्हल, जोहर

22 जानेवारी: न्यूझीलंड विरुद्ध सामोआ, सकाळी 10:30, सारवाक क्रिकेट ग्राउंड (SCG)

22 जानेवारी: ऑस्ट्रेलिया वि एशिया क्वालिफायर, दुपारी 2:30 वाजता, UKM YSD ओव्हल

22 जानेवारी: पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड, दुपारी 2:30 वाजता, जेसीए ओव्हल, जोहर

22 जानेवारी: दक्षिण आफ्रिका विरुद्ध आफ्रिका क्वालिफायर, दुपारी 2:30 वाजता, सारवाक क्रिकेट ग्राउंड (SCG)

23 जानेवारी: भारत विरुद्ध श्रीलंका, दुपारी 2.30 वाजता, ब्युमास ओव्हल

24 जानेवारी: B4 वि C4, सकाळी 10:30, JCA ओव्हल, जोहोर

24 जानेवारी: A4 विरुद्ध D4, दुपारी 2:30, JCA ओव्हल, जोहर

25 जानेवारी: सुपर सिक्स - B2 वि C3, सकाळी 10:30, UKM YSD ओव्हल

25 जानेवारी: सुपर सिक्स - B1 वि C2, सकाळी 10:30, सारवाक क्रिकेट ग्राउंड (SCG)

26 जानेवारी: सुपर सिक्स - ए२ वि डी ३, सकाळी १०:३०, ब्युमास ओव्हल

26 जानेवारी: सुपर सिक्स - ए१ वि डी २, दुपारी २:३०, ब्युमास ओव्हल

27 जानेवारी: सुपर सिक्स - B1 विरुद्ध C3, सकाळी 10:30, सारवाक क्रिकेट ग्राउंड (SCG)

28 जानेवारी: सुपर सिक्स - A3 विरुद्ध D2, सकाळी 10:30, ब्युमास ओव्हल

28 जानेवारी: सुपर सिक्स - C1 वि B2, सकाळी 10:30, सारवाक क्रिकेट ग्राउंड (SCG)

28 जानेवारी: सुपर सिक्स - A1 विरुद्ध D3, दुपारी 2:30, ब्युमास ओव्हल

29 जानेवारी : सुपर सिक्स - C2 वि B3, सकाळी 10:30, UKM YSD ओव्हल

29 जानेवारी: सुपर सिक्स - A2 विरुद्ध D1, दुपारी 2:30, UKM YSD ओव्हल

31 जानेवारी: उपांत्य फेरी 1, सकाळी 10:30, ब्युमास ओव्हल

31 जानेवारी: उपांत्य फेरी 2, दुपारी 2:30 वाजता, ब्यूमास ओव्हल

2 फेब्रुवारी: अंतिम, दुपारी 2:30 वाजता, ब्यूमास ओव्हल

U19 Women T20 World Cup 2025: ICC महिला अंडर-19 टी20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर, टीम इंडियासमोर असेल 'या' संघांचे आव्हान
Viral Cricket Video: लेडी बुमराह...शाळेचा गणवेश घालून तरुणीची भन्नाट गोलंदाजी; VIDEO पाहून कौतुकच कराल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com