Viral Cricket Video: लेडी बुमराह...शाळेचा गणवेश घालून तरुणीची भन्नाट गोलंदाजी; VIDEO पाहून कौतुकच कराल

Young Girl Bowling like Jasprit Bumrah Video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक तरुणी जसप्रीत बुमराहसारखी गोलंदाजी करताना दिसत आहे.
Viral Cricket Video: लेडी बुमराह...शाळेचा गणवेश घालून तरुणीची भन्नाट गोलंदाजी; VIDEO पाहून कौतुकच कराल
viral videotwitter
Published On

Girl Bowling Like Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. बुमराह आपल्या धारदार गोलंदाजीमुळे ओळखला जातो. त्याची गोलंदाजी ॲक्शन जरा वेगळीच आहे. त्यामुळे जवळपास प्रत्येकानेच त्याच्यासारखी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न एकदा तरी नक्कीच केला असेल.

दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय ज्यात एक मुलगी शाळेचा गणवेश घालून हुबेहूब जसप्रीत बुमराहसारखी गोलंदाजी करताना दिसून येत आहे.

Viral Cricket Video: लेडी बुमराह...शाळेचा गणवेश घालून तरुणीची भन्नाट गोलंदाजी; VIDEO पाहून कौतुकच कराल
IND vs BAN: टीम इंडियाचा हा फलंदाज बांगलादेशला एकटा नडणार! रोहित - विराटपेक्षा खतरनाक आहे रेकॉर्ड

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हीही या मुलीला लेडी बुमराह असच म्हणाल. बुमराह शॉर्ट रनअप घेऊन वेगवान चेंडू टाकतो. त्याची ॲक्शन दिसायला सोपी असली तरीदेखील त्यांच्यासारखी गोलंदाजी करणं जरा कठीणच आहे. मात्र व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये या मुलीने त्याची ॲक्शन हुबेहूब कॉपी केली आहे.

शाळेचा गणवेश घालून गोलंदाजी करणं जरा कठीण आहे. मात्र ती शानदार गोलंदाजी करतेय. केवळ गोलंदाजी नव्हे तर ती फलंदाजीतही उत्तम आहे. त्यामुळे तिला लेडी बुमराह असं म्हटलं जात आहे. यासह काही नेटकऱ्यांनी तिला भारतीय संघात स्थान देण्याची मागणीही केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

Viral Cricket Video: लेडी बुमराह...शाळेचा गणवेश घालून तरुणीची भन्नाट गोलंदाजी; VIDEO पाहून कौतुकच कराल
IND vs BAN: गंभीर-रोहितला डोकेदुखी! केएल राहुल, श्रेयस अय्यर अन् रिषभ पंत यांच्यामुळे या तिघांचा पत्ता कट?

जसप्रीत बुमराहने भारताला टी -२० वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. या संपूर्ण स्पर्धेत त्याच्या गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला होता. मात्र ही स्पर्धा झाल्यानंतर त्याला विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय संघाने झिम्बाब्वेचा दौरा केला. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध ३ वनडे आणि ३ टी -२० सामन्यांची मालिका खेळली.

या मालिकांमध्ये त्याला विश्रांती देण्यात आली होती. आता बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या मालिकेतही त्याला विश्रांती दिली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान तो थेट न्यूझीलंडविरुद्ध कमबॅक करताना दिसून येऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com