भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी -२० सामन्यांची मालिका पार पडली. टी -२० मालिकेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने श्रीलंकेचा सुपडा साफ केला.
तर वनडे मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघासमोर बांगलादेशचं आव्हान असणार आहे. या मालिकेत जर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) खेळला, तर त्याला एक मोठा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे.
जसप्रीत बुमराह बांगलादेशविरुद्ध खेळण्याची शक्यता खूप कमी आहे. मात्र जर त्याला ही मालिका खेळण्याची संधी मिळाली तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० चा आकडा पार करू शकतो.
जसप्रीत बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० गडी बाद करण्याचा पल्ला गाठण्यापासून केवळ ३ गडी दूर आहे. त्याच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३९७ गडी बाद करण्याची नोंद आहे.
भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. जर बुमराहला ही मालिका खेळण्याची संधी मिळाली तर तो पहिल्याच सामन्यात हा रेकॉर्ड मोडून काढू शकतो. बुमराहच्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर त्याने टी -२० क्रिकेटमध्ये ८९ गडी बाद केले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये १५९ आणि वनडे सामन्यांमध्ये त्याने १४९ गडी बाद केले आहेत.
१)अनिल कुंबळे -९५३ गडी
२)आर अश्विन - ७४४ गडी
३) हरभजन सिंग - ७०७ गडी
४) कपिल देव - ६८७ गडी
५)जहीर खान - ५९७ गडी
६)रवींद्र जडेजा - ५६८ गडी
७) जवागल श्रीनाथ - ५५१ गडी
८) मोहम्मद शमी - ४४८ गडी
९) ईशांत शर्मा - ४३४ गडी
१०) जसप्रीत बुमराह - ३९७ गडी
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.