आज मुंबईतील NSCI डोम स्टेडियममध्ये प्रो गोविंदा लीग स्पर्धेतील फायनलचा थरार रंगणार आहे. आयपीएल स्पर्धेप्रमाणे पारंपारीक दहीहंडी स्पर्धा पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्तरावर होणार आहे. पात्रता फेरीतील सामने जिंकून १६ संघांनी जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या संघांना ट्रॉफी आणि रोख रक्कम दिली जाणार आहे.
राज्याचे उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. गतवर्षी पहिल्यांदाच प्रो गोविंदा लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेला तुफान प्रतिसाद मिळाला होता. ही लोकप्रियता पाहता, या स्पर्धेचे दुसऱ्यांदा आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत आमदार प्रताप सरनाईक, प्रो गोविंदा लीगचे संस्थापक व अध्यक्ष, प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक, प्रो गोविंदा लीगचे संचालक मजहर नाडियादवाला, प्रो गोविंदा लीगचे संचालक मोहम्मद मोरानी उपस्थित होते.
यातील सर्वाधिक संघ हे मुंबई व ठाणे येथील आहेत. ही स्पर्धा डोम एसव्हीपी स्टेडियम मध्ये आयोजित केली जाणार आहे. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या संघास २५ लाख रुपये तर उपविजेत्या संघाला १५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी अनुक्रमे दहा लाख व पाच लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे त्याखेरीज उर्वरित बारा संघांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. कुठलाही गोविंदा जखमी होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जाणार आहे.
गोविंदा पथकातील प्रत्येकाची आहारापासून वैद्यकीय सुविधापर्यंत सर्व व्यवस्था फ्रॅंचाईजीतर्फे केली जाणार आहे. तसेच या लीग स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांसाठी सरकारने विमा देखील दिला आहे.
गोविंदाची मागणी लक्षात घेऊन यंदा सहभागी होणाऱ्या एक लाख नोंदणीकृत गोविंदाचा शासनातर्फे विमा उतरविण्यात येणार आहे. आतापर्यंत १४ हजार गोविंदांनी आपली नोंदणी केली असून एक लाख पर्यंत ही नोंदणी होईल अशी अपेक्षा आहे. या स्पर्धांचे स्टार्स स्पोर्ट्स वाहिनीवर प्रक्षेपण केले जाणार आहे. गोविंदा प्रेमी लोकांनी स्पर्धेच्या ठिकाणी येऊन गोविंदांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन श्री सामंत यांनी केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.