Lionel Messi Kolkata stadium chaos incident 
Sports

Lionel Messi : कोलकात्यात राडा! बाटल्या फेकल्या, पोस्टर फाडले; मेस्सीने फक्त १० मिनिटात मैदान सोडले, पाहा व्हिडिओ

Lionel Messi’s Kolkata Event : लिओनेल मेस्सीच्या कोलकाता दौऱ्यात मोठा गोंधळ उडाला. गैरव्यवस्थापनामुळे संतप्त चाहत्यांनी बाटल्या फेकल्या, पोस्टर फाडले आणि मेस्सी अवघ्या दहा मिनिटांत मैदान सोडून गेला.

Namdeo Kumbhar

Lionel Messi Kolkata stadium chaos incident : अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर आला आहे. आज सकाळी कोलकात्यात त्याचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. मेस्सीच्या या दौऱ्यामुळे फुटबॉलप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. कोलकात्यामध्ये मेस्सीला पाहण्यासाटी अलोट गर्दी झाली होती. पण मेस्सी लगेच गेल्याने चाहते संतापले त्यामुळे कोलकात्याच्या मैदानात राडा झाला.

विवेकानंद युवा भारती स्टेडियममधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. परिस्थिती पाहून मेस्सीने कार्यक्रमातून काढता पाय घेतला. मेस्सीला पाहण्यासाठी हजारो चाहते काही तासांपासून स्टेडियममध्ये होते. पण कार्यक्रम जसजसा पुढे सरकत गेला तसतसा संताप वाढत गेला. मिळालेल्या माहितीनुसार, स्टेडियममध्ये प्रवेश करणे, बसण्याची व्यवस्था याबाबत मोठ्या प्रमाणात गैर व्यवस्थापन होते. अनेक चाहत्यांना त्यांच्या फुटबॉल आयकॉनला जवळून पाहण्याची आशा होती. पण अनेकांना त्याची झलकही पाहायला मिळाली नाही. त्यामुळे मेस्सीचे चाहते संतापले. त्यांनी बाटल्या फेकल्या अन् पोस्टरही फाडले. कोलकात्याच्या मैदानावर राडा झाला होता. मेस्सी मैदानात आला अन् दहा मिनिटात निघून गेला.

संतप्त चाहत्यांनी मैदानाबाहेरी अन् आतील पोस्टर्स आणि होर्डिंग्जची तोडफोड केली. बाटल्या फेकल्या आणि स्टेडियममध्ये गोंधळ घातला. एका क्षणात परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना अतिरिक्त सैन्य तैनात करावे लागले. गोंधळाच्या दरम्यान मेस्सीला इतर व्हीव्हीआयपी पाहुण्यांसह कडक सुरक्षेत बाहेर काढण्यात आले.

भारतामधील ४ शहरात मेस्सीचा दौरा -

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉल खेळाडू लिओनाल मेस्सी हा तीन दिवस भारत दौऱ्यावर आहे. आज पहाटे ३.३० वाजता त्याचे आगमन कोलकाता विमानतळावर झाले. चोख सुरक्षा बंदोबस्तात मेस्सी बाहेर येताच त्याला पाहण्यासाठी जमलेल्या फुटबॉल चाहत्यांनी एकच जल्लोष केला. कोलकाता मधील रस्त्यांवर ठिकठिकाणी आतिषबाजी करण्यात आली तसेच विमानतळ परिसरात तर फॅन्संनी तोबा गर्दी केली होती. मेस्सी कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली अशा ४ शहरांचा दौरा करणार आहे..

मेस्सीसाठी हनिमून रद्द -

विशेष म्हणजे हैदराबादमधील एका नवविवाहित जोडप्याने मेस्सीला पाहण्यासाठी चक्क आपले हनिमून रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. 'हनिमूनपेक्षा मेस्सीला पाहणे जास्त महत्त्वाचे आहे,' अशी भावना या चाहत्यांनी व्यक्त केली. मेस्सी या दौऱ्यात कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली या शहरांना भेटी देणार आहे. मुंबईत तो वानखेडे स्टेडियमवर उपस्थित राहणार असून, देशभरातील फुटबॉल प्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रॅपिडो बाईक चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; कल्याणमध्ये खळबळ

Sunday Horoscope : लॉटरीमध्ये भरपूर पैसा मिळेल; ५ राशींच्या लोकांसाठी रविवार गेमचेंजर ठरणार

Kolhapur IT Park: कोल्हापुरात होणार आयटीपार्क, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी

कर्नाटकात भाकरी फिरणार; शिवकुमार मुख्यमंत्री होणार, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

हाताने उखडला डांबरी रस्ता, ग्रामस्थांचा ठेकेदाराविरोधात संताप

SCROLL FOR NEXT