Tukaram Mundhe Clean Chit News : सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या गंभीर प्रकरणात मुंडे यांना आता अधिकृतपणे 'क्लीन चिट' मिळाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ईओडब्ल्यू अर्थात आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची सखोल पोलिस चौकशी केली होती. मात्र या चौकशीत त्यांच्याविरोधात काहीही आक्षेपार्ह किंवा कोणताही गैरव्यवहार आढळलेला नाही. खुद्द राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत ही महत्त्वपूर्ण माहिती अधिकृतपणे दिली आहे. त्यामुळे तुकाराम मुंडे यांच्यावरील आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे आता समोर आले असून, त्यांना या चौकशीतून मोठा दिलासा मिळाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.