

देशात सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा थरार सुरू आहे. नव्या दमाचे खेळाडू आपला करिश्मा दाखवत आहेत. पण या स्पर्धेला मॅच फिक्सिंगचे गालबोट लागले आहेत. ४ खेळाडूंनी मॅच फिक्सिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना देशांतर्गत क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले आहे. आसाम संघातील अमित सिन्हा, इशान अहमद, अभिषेक ठाकुरी आणि अमन त्रिपाठी या चार खेळाडूंनी फिक्सिंग केल्याचे पुरावे मिळाले. त्यानंतर या चार खेळाडूंचे निलंबन करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयकडून त्या चारही खेळाडूंविरोधात कारवाई करण्यात आले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगमुळे देशात खळबळ उडाली आहे.
देशांतर्गत क्रिकेटवर मॅच फिक्सिंगचा धोका पुन्हा एकदा ओढावला आहे. आसाम क्रिकेट असोसिएशनचे सचिव सनातन दास यांनी याबाबत माहिती दिली. सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीच्या लीग टप्प्यात क्रिकेटशी संबंधित मॅच फिक्सिंग झाली. यामध्ये आसामचे चार खेळाडू दोषी आढलले आहेत. अमित सिन्हा, इशान अहमद, अमन त्रिपाठी आणि अभिषेक ठाकुरी यांचं तात्काळ निलंबित केले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहितीही दास यांनी दिली.
२६ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान लखनौ येथे झालेल्या सामन्यावेळी मॅच फिक्सिंग झाल्याचं समोर आली आहे. त्यांनी आसाम संघातील काही खेळाडूंना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला.याबाबत बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्षा युनिट (एसीएसयू) ने चौकशी केली. एसीएने या चार खेळाडूंविरोधात कारवाई केली असून गुवाहाटीमध्ये एफआयआर दाखल केला आहे, असे दास यांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतची माहिती दिली आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत आसामला बीसीसीआयने एलिट ग्रुप ए मध्ये स्थान दिले होते. या संघाचे नेतृत्व रियान पराग करत आहेत. आसाम संघाला या स्पर्धेत सातपैकी फक्त तीन सामन्यात विजय मिळवता आला. त्यामुळे हा संघ आठ पैकी सातव्या क्रमांकावर राहिला. मॅच फिक्सिंग प्रकरणात नाव असलेल्या चार खेळाडूंपैकी एकही जण सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी आसाम संघाचा भाग नव्हता. दरम्यान, अमित सिन्हा या फलंदाजाने आसामसाठी ३२ प्रथम श्रेणी सामने (२२.७९ च्या सरासरीने १२०८ धावा), ४६ लिस्ट ए सामने आणि ३१ टी-२० सामने खेळले आहेत. यष्टिरक्षक फलंदाज असलेल्या ठाकुरीने या हंगामात दोन रणजी करंडक सामन्यांसह १२ प्रथम श्रेणी सामने (२३.७३ च्या सरासरीने ४५१ धावा) खेळले आहेत. त्याशिवाय त्याने ११ लिस्ट ए आणि १० टी-२० सामने खेळले आहेत.
आसाम संघ कोणत्याही मॅच फिक्सिंगमध्ये अडकला आहे. निलंबित करण्यात आलेले खेळाडू सय्यद मुश्ताक अली चषकात आसाम संघाचा भाग नव्हते. पण त्या खेळाडूंनी मॅच फिक्सिंगच्या उद्देशाने संघातील खेळाडूंसोबत संपर्क केला होता. आसामचा कर्णधार रियान पराग याच्यासोबत त्यांनी संपर्क केलेला होता. रियान परागने याबाबत बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्षा युनिटला याची तक्रार दिली होती, अशी माहिती एसीएचे अध्यक्षांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.