

Maharashtra’s New Expressway : पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर हे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे, त्यासाठी नवा महामार्ग तयार केला जाणार आहे. यासाठी १४ हजार कोटी रुपयांचा खर्च होऊ शकतो. हा महामार्ग तयार झाल्यानंतर ५ तासांचा प्रवास फक्त ९० मिनिटांवर येईल, असा अंदाज वर्तवला जातोय. वाढवण ते समृद्धी महामार्ग जोड प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येत आहे. लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी बुधवारी विधानसभेत दिली. हा प्रकल्प पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वरमार्गे इगतपुरीला जोडला जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
वाढवण बंदर फक्त पालघर जिल्ह्यासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाच्या आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या बंदराशी संलग्न पायाभूत सुविधा उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामध्ये वाढवण बंदर ते हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जोडमार्गाचे (फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प) काम लवकरच सुरू केले जाईल, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
महाराष्ट्राच्या महत्त्वाकांक्षी बंदर विकास उपक्रमाला गती देण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या प्रस्तावित जोडमार्गाची लांबी साधारण 104–105 किलोमीटर इतकी आहे. हा महामार्ग 3+3 अशा सहा लेनचा असू शकतो. या महामार्गाची प्रस्तावित रुंदी 100 मीटर तर बोगद्यांची रुंदी 80 मीटर इतकी असेल. या मार्गावर 100 किमी प्रति तास वेगाने प्रवास करता येणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे. ५ तासांचा प्रवास फक्त ९० मिनिटांत पूर्ण होईल.
सध्याच्या 183 किलोमीटर अंतराच्या तुलनेत नवीन जोडमार्गामुळे प्रवास 104 किलोमीटरपर्यंत होणार आहे. यामध्ये 78 किलोमीटरची बचत होईल. त्यामुळेच पाच तासांचा हा प्रवास कमी होऊन तो एक ते दीड तासात पूर्ण होईल. हा प्रस्तावित महामार्ग पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा तसेच नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या भागांतून जाणार आहे. एकूण ६५ गावे या मार्गात समाविष्ट आहे. या प्रकल्पाचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR) तयार करण्याचे काम सुरू आहे. १४,००० कोटी रुपये इतका खर्च होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.