Cyber Crime: पुणेकरांना सायबर ठगांनी गंडवलं, एकाच दिवशी ११ गुन्हे अन् कोट्यवधींची फसवणूक

Pune Cyber Crime Alert: पुण्यात सायबर गुन्हेगारांनी एकाच दिवशी ११ ठिकाणी फसवणूक करत दोन कोटी १६ लाख रुपयांची ऑनलाइन लूट केली. बनावट अॅप, लिंक व ट्रेडिंगच्या आमिषाने नागरिकांना गंडवण्यात आले.
Cyber Crime:
Cyber Crime: saam tv
Published On

Pune cyber crime News : गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारांनी महाराष्ट्रासह देशात कहर केलाय. शुक्रवारी पुण्यात सायबर गुन्हेगारांनी हद्द पार केली. एकाच दिवसात पुण्यात ११ वेगवेगळ्या ठिकाणी गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. सायबर गुन्हेगारांनी पुणेकरांचे दोन कोटी १६ लाख रूपयांवर डल्ला मारलाय. या प्रकारानंतर पुणे पोलीस सतर्क झाले असून तपास करण्यात येत आहे.

पुण्यात सायबर चोरट्यांचा गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ सुरू आहे. पुण्यामध्ये एकाच दिवशी सायबर गुन्हेगारीच्या ११ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. पुण्यातून एकाच दिवशी दोन कोटी १६ लाखांची ऑनलाइन लूट झाल्याचे समोर आलेय. फेडेक्स कुरिअर, मनी लाँड्रींग, शेअर ट्रेडिंग, प्रीपेड टास्क, फेक अॅप, बनावट लिंक अशा विविध माध्यमातून सायबर गुन्हेगारांनी नागरिकांचे बॅंक खाते रिकामे केलेय. त्यामुळे कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआधी हजारवेळा विचार करावा. पोलिसांकडून या गुन्ह्यांचा तपास करण्यात येत आहे. कोणत्याही लिंकवर नागरिकांनी क्लिक करू नये, अशी सूचना पोलिसांकडून करण्यात आली आहे.

Cyber Crime:
"बाबुराव को गुस्सा क्यू आता है"? पुण्यात राष्ट्रवादीच्या नेत्याचा आणखी एक व्हिडिओ अन् पुन्हा गुन्हा, वाचा प्रकरण

पुण्यातील विविध पोलिस ठाण्यात एकाच दिवशी ११ गुन्ह्यांची नोंद

१. सायबर पोलिस ठाणे: ‘मनी लाँड्रींग’च्या नावाने फसवणूक

सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकास मनी लाँड्रींगची भीती दाखवून चौकशीच्या बहाण्याने ६३ लाख ४० हजार रुपये बॅंक खात्यात जमा करण्यास भाग पाडले

२. वारजे: बनावट गुंतवणूक अॅपद्वारे ५४.८१ लाखांची लूट

स्टॉक ट्रेडिंगमध्ये भरघोस परताव्याचे आमिष दाखवून एका ५८ वर्षीय व्यक्तीला लिंक पाठवली. त्या लिंकद्वारे ‘घानी सिक्युरिटी’ नावाचे अॅप इन्स्टॉल करायला सांगण्यात आले. अॅप पूर्णपणे बनावट असल्याचे लक्षात येईपर्यंत ५४ लाख रुपये गायब

३. खडक: प्रीपेड टास्कद्वारे पाच लाखांचा फटका

गणेशपेठेतील एका व्यक्तीस टेलिग्रामद्वारे प्रीपेड टास्क पाठवण्यात आले. ‘टास्क पूर्ण केल्यास भरपूर पैसे मिळतील,’ असे सांगत सतत पैसे जमा करण्यास सांगण्यात आले.

४. उत्तमनगर: महिलेची ३.३७ लाखांची फसवणूक

शेअर ट्रेडिंगमध्ये चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ६३ वर्षीय ज्येष्ठ महिलेस लिंक पाठवून काढून घेतले पैसे

Cyber Crime:
पुण्यात ५३२ कोटींचा प्रोजेक्ट, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा, वाचा नेमका प्लान आहे तरी काय

५. नांदेड सिटी: शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ५.६१ गायब

शेअर मार्केटमध्ये फायदा मिळेल असे ४७ वर्षीय व्यक्तीला सांगून गुंतवणुकीच्या नावाखाली सतत रक्कम भरण्यास लावले आणि बँकेतील ५.६१ लाखांचा फटका बसला

६. कोथरूड: पार्सल कस्टममध्ये अडकले

फेडेक्स कुरिअरमधून बोलत असल्याचे भासवून चोरट्यांनी ५१ वर्षीय व्यक्तीला ‘आपले पार्सल कस्टममध्ये अडकले आहे,’ असे सांगिले. पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याची भीती दाखवून फिर्यादीकडून बँक खात्याचे तपशील घेऊन २५ लाखांहून अधिक रक्कम बॅंक खात्यात वळवली.

७. चतु:शृंगी: प्रीपेड टास्कच्या बहाण्याने १४.६९ लाखांना गंडा

औंधमधील व्यक्तीस प्रीपेड टास्क देत कमाईचे लालच दाखवण्यात आले. चांगल्या परताव्याच्या आमिषाने १४.६९ लाख रुपये हडप करण्यात आले.

८. बाणेर: प्रीपेड टास्कद्वारे २५ लाख उकळले

प्रीपेड टास्कमधून मोठ्या कमाई मिळवून देण्याच्या नावाखाली बाणेरमधील ४५ वर्षीय व्यक्तीकडून २५ लाख रुपये उकळले.

९. वानवडी: ज्येष्ठ महिलेची ९.७८ लाखांची फसवणूक

ज्येष्ठ महिलेने कोणतीही माहिती, ओटीपी किंवा तपशील न देता त्यांच्या डेबिट कार्डमधून सायबर चोरट्यांनी ९.७८ लाख रुपये काढले.

Cyber Crime:
Election : महापालिका निवडणुकीआधी शिंदेंचा ठाकरेंना मोठा धक्का, १६ बड्या नेत्यांनी केला जय महाराष्ट्र

१०. वानवडी : ५.६१ लाखांची शेअर फसवणूक

एका ५९ वर्षीय व्यक्तीस शेअर ट्रेडिंगमध्ये चांगल्या परताव्याचे स्वप्न दाखवण्यात आले. सतत रक्कम टाकायला लावून ५.६१ लाखांची फसवणूक केली.

११. चंदननगर: तरुणीला चार लाखांना गंडा

तरुणीला हॉटेल रिव्ह्यू आणि लाईक करण्यासाठी ‘टास्क’ देण्यात आले. टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम भरल्यानंतर तिला आपले पैसे गेल्याचे समजले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com