Baburao Chandere assault complaint in Baner Pune : पुण्यात वेळोवेळी मारहाण आणि शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ मधून समोर येणारे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे यांचा आणखी एक प्रताप सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रस्ता आणि पाईप लाईनचे काम कायदेशीर परवानगी घेऊन करावे, असे सांगितल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाबुराव चांदेरे व इतरांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष जयेश संजय मुरकुटे यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी बाबुराव चांदरे, समीर चांदेरे, सिद्ध कलशेट्टी व एका अनोळखी व्यक्तीवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चांदेरे यांना विचारले असता ते म्हणाले, "मी संबंधित व्यक्तीच्या वडिलांना विचारूनच तिथे काम सुरू केलं होतं, मी काही चुकीचं केलेले नाही. नकारात्मक गोष्टींना मी महत्त्व देणार नाही." यापूर्वी चांदेरे यांचे अनेक मारहाण आणि शिवीगाळ केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
यावर्षीच्या जानेवारी महिन्यात बाबुराव चांदेरे यांनी एका बांधकाम व्यावसायिकाला मारहाण केली होती. ड्रेनेज लाईन टाकण्यावरून हा वाद झाला होता. संबंधित व्यक्तीच्या जागेतून ड्रेनेज लाईन टाकली जाणार होती मात्र त्यातून वाद झाला आणि व बाबुराव चांदेरे यांनी त्या व्यक्तीला उचलून अक्षरशः जमिनीवर आपटलं होतं. त्यावेळीस सुद्धा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि कारवाईची मागणी जोर धरू लागल्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांना जाग आली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. याच वर्षी फेब्रुवारी मध्ये जमिनीच्या वादातून बावधन सूस परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी प्रकरणी चांदेरे यांच्या विरोधात अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
२०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे यांनी पुण्यातील बालेवाडी क्रीडासंकुलात आयोजित कब्बडी स्पर्धेत पंचावर हात उगारल्याची घटना घडली होती. कबड्डीचा सामना सुरू असता पंचांनी दिलेला निर्णय न पटल्याने बाबुराव चांदेरे संतप्त झाले आणि त्यांनी पंच यांना शिवीगाळ करत हात उगारला होता. जुलै २०२३ मध्ये सुद्धा चांदेरे यामध्ये एका रिक्षा चालकाला मारहाण केली होती. बाणेर परिसरात वाहतूक सुरळीत करताना संबंधित रिक्षा चालक अडथळा निर्माण करत असल्याने त्यातून हा प्रकार घडल्याचं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं.
नेमके हे बाबुराव चांदेरे आहेत तरी कोण?
बाबुराव चांदेरे हे अजित पवारांचे पुण्यातील निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादी काँग्रेस कडून ते तीन टर्म नगरसेवक राहिले असून स्थायी समितीचे माजी चेअरमन पदाची सुद्धा जबाबदारी बाळगली आहे. अनुभव असल्याने त्यांच्यावर राज्य कबड्डी संघटनेच्या सरकार्यवाह पदाची जबाबदारी होती. पुण्यात अजित पवारांचा जिथे कार्यक्रम असतात तिथे चांदेरे प्रकर्षाने दिसून येतात...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.