team india twitter
क्रीडा

अखेर झुकावं लागलं! पाकिस्तान नव्हे, तर या देशात होणार Champions Trophy ची फायनल

Ankush Dhavre

ICC Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डने या स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. पाकिस्तानला अजूनही वाटतंय की, भारतीय संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात येणार.

मात्र भारतीय संघाकडून कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही. २००८ नंतर भारतीय संघाने पाकिस्तानचा एकही दौरा केलेला नाही. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही, हे जवळजवळ निश्चित आहे. दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

कुठे होणार चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतर्गत वादांमध्ये दोन्ही संघ देशांतर्गत मालिका खेळताना दिसून येत नाहीत. हे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमनेसामने येत असतात.

आता टेलीग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, आगमी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन हायब्रिड मॉडेलमध्ये केले जाऊ शकते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार, या स्पर्धेची फायनल लाहौरमध्ये खेळवली जाणार आहे. मात्र जर भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला, तर या सामन्याचे आयोजन दुबईत केले जाऊ शकते.

यापूर्वी आशिया कप २०२३ स्पर्धेचे यजमानपदही पाकिस्तानकडे होते. त्यावेळीही पाकिस्तान क्रिकेट बोर्डने भारतीय संघाने पाकिस्तामध्येच खेळण्यासाठी यावं, असा हट्ट धरला होता. मात्र बीसीसीआयने स्पष्ट नकार कळवला होता. त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन श्रीलंकेत केले गेले होते. स्पर्धेतील फायनलचा सामना पाकिस्तानात होणार होता. मात्र भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केल्याने, हा सामना श्रीलंकेत खेळवण्यात आला होता.

या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानात करण्यात आले, तरीदेखील भारतीय संघाचे सामने हे पाकिस्तानात होणार नाही. साखळी फेरीतील सामने हे पाकिस्तानच्या बाहेर होतील. जर भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये आणि फायनलमध्ये प्रवेश केला, तरीदेखील सामन्याचे ठिकाण बदलण्यात येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ranveer Singh: रणवीर सिंगचा रूबाबदार लूक, एकदा बघाच...

Vinesh Phogat : कुस्तीचा आखाडा, ऑलिम्पिक ते निवडणूक; विनेश फोगाटच्या आयुष्यात ८ तारखेचा मोठा योग

Maharashtra Politics: कॉन्फिडन्स वाढला! हरियाणाच्या विजयानं भाजप आक्रमक; राज्यातही पुन्हा महायुती सरकार? वाचा स्पेशल रिपोर्ट

IND vs BAN: मोठी बातमी! दुसऱ्या सामन्याआधी स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा

PM Narendra Modi Speech : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना याच्या पेक्षा मोठी श्रद्धांजली काय असेल; निवडणुकांच्या निकालावर PM मोदी काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT