team india twitter
Sports

IND vs AUS, Weather Prediction: मालिकेसह WTC फायनलही निसटणार! सिडनी कसोटीआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

India vs Australia 5th Test, Weather Update: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा मालिकेतील पाचवसा कसोटी सामना हा सिडनीच्या मैदानावर रंगणार आहे. भारतीय संघासाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.

Ankush Dhavre

बॉर्डर- गावसकर मालिकेतील शेवटचा कसोटी सामना सिडनीमध्ये रंगणार आहे. या सामन्याला ३ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे.

त्यामुळे मालिका बरोबरीत आणण्यासाठी हा सामना जिंकणं भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे. तर दुसरीकडे सामना ड्रॉ झाला, तरीदेखील ऑस्ट्रेलियाचा संघ या ट्रॉफीवर कब्जा करणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वीच भारतीय संघासाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.

सिडनी कसोटीवर पावसाचं संकट?

मालिकेतील शेवटचा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यावर पावसाचं संकट असणार आहे. विजडन क्रिकेटने दिलेल्या वृत्तानुसार, या सामन्यातील चौथ्या आणि पाचव्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जर पावसामुळे सामना ड्रॉ झाला, तर ही ऑस्ट्रेलियासाठी आनंदाची बातमी असेल. तर दुसरीकडे भारतीय संघाच्या टेन्शनमध्ये वाढ होणार आहे. कारण हा सामना ड्रॉ झाल्यास, मालिका तर हातून जाईल. यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्याचे मार्गही बंद होणार आहेत.

बीबीसी वेदरने दिलेल्या वृत्तानुसार, सामन्याच्या पहिल्या दिवशीही पाऊस हजेरी लावू शकतो. यासह सामन्याच्या चौथ्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता ही ६८ टक्के इतकी असणार आहे.

भारतीय संघ २-१ ने पिछाडीवर

या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला होता. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने कमबॅक करत भारतीय संघावर दमदार विजय मिळवला. मालिका १-१ ने बरोबरीत आल्यानंतर तिसरा सामना ड्रॉ राहिला होता. त्यानंतर मेलबर्नच्या मैदानावर पार पडलेल्या चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने कमबॅक करत मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fighting Viral Video: कारमध्ये बसवून धू धू धुतलं, आधी मुलीनं मारलं; नंतर मित्रानेच ९० सेकंदात २६ वेळा तरुणाच्या कानशिलात लगावल्या| पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: मथुरेत पावसाचा हाहाकार, यमुना नदीचे पाणी घरात शिरलं

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर वाढले; १० तोळ्यामागे ८,७०० रुपयांनी वाढ, वाचा आजचे भाव

Fruits For Kidney : आहारात या ६ फळांचा समावेश केल्यास मूत्रपिंडासाठी ठरतील वरदान, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT