IND vs AUS 5th Test: टीम इंडियाचं टेन्शन वाढणार! सिडनी कसोटीत हा खतरनाक खेळाडू ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणार

Australia Playing XI For India vs Australia 5th Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा कसोटी सामना सिडनीत रंगणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने प्लेइंग ११ ची घोषणा केली आहे.
IND vs AUS 5th Test: टीम इंडियाचं टेन्शन वाढणार! सिडनी कसोटीत हा खतरनाक खेळाडू ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणार
australiayandex
Published On

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा सामना मेलबर्नच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

शानदार विजयासह ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. दरम्यान मालिकेतील पाचवा आणि अंतिस सामना हा दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. हा सामना सिडनीच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या प्लेइंग ११ची घोषणा केली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना ३ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या सामन्यापू्र्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने २ डिसेंबरला पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्याने प्लेइंग ११ बाबत मोठा खुलासा केला आहे. मालिकेतील शेवटच्या सामन्यातून मिचेल मार्शला बाहेर ठेवलं जाणार आहे. तर ३२१ वर्षीय खेळाडू ब्यू वेबस्टरला पदार्पणाची संधी दिली जाणार आहे. या सामन्यातून तो कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे.

IND vs AUS 5th Test: टीम इंडियाचं टेन्शन वाढणार! सिडनी कसोटीत हा खतरनाक खेळाडू ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणार
IND vs AUS 5th Test: भारत- ऑस्ट्रेलिया पाचव्या कसोटीची वेळ बदलली? जाणून घ्या किती वाजता सुरु होणार सामना

मार्शला बाहेर करण्याचं कारण काय?

मिचेल मार्शला मालिकेतील सुरुवातीच्या चारही सामन्यांमध्ये संधी दिली गेली होती. मात्र पाचव्या सामन्यातून त्याला बाहेर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याने ४ सामन्यातील ७ डावात फलंदाजी करताना १०.४२ च्या सरासरीने ७३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एकदा ४७ धावांची खेळी केली होती.

त्यानंतर त्याला एकही मोठी खेळी करता आलेली नाही. फलंदाजीत फ्लॉप ठरण्यासह तो गोलंदाजीतही फ्लॉप ठरला आहे. गोलंदाजी करताना त्याला अवघे ३ गडी बाद करता आले. यासह फिटनेसमुळेही त्याला संघाबाहेर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ २-१ ने आघाडीवर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे बॉर्डर- गावसकर मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.

IND vs AUS 5th Test: टीम इंडियाचं टेन्शन वाढणार! सिडनी कसोटीत हा खतरनाक खेळाडू ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणार
IND vs AUS: रोहित - विराट सिडनीत शेवटचा सामना खेळणार? दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य

मालिकेतील शेवटच्या कसोटीसाठी अशी आहे ऑस्ट्रेलियाची प्लेइंग ११:

सॅम कॉन्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलँड.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com