IND vs AUS: रोहित - विराट सिडनीत शेवटचा सामना खेळणार? दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य

Virat Kohli- Rohit Sharma Retirement: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीची जोरदार चर्चा सुरु आहे.
IND vs AUS: रोहित - विराट सिडनीत शेवटचा सामना खेळणार? दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य
Rohit Sharma And virat kohli afp
Published On

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही गेल्या काही मालिकांमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. दोघांनाही सातत्याने संधी मिळत आहे, मात्र दोघेही धावा करण्यात अपयशी ठरत आहेत.

त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेली बॉर्डर - गावसकर कसोटी मालिका ही दोघांच्याही कसोटी कारकिर्दीतील शेवटची मालिका असू शकते, असं म्हटलं जात आहे. मात्र खरंच ही दोघांच्याही कसोटी मालिकेतील शेवटची मालिका असेल का? याबाबत माजी भारतीय खेळाडू रवी शास्त्री यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.

IND vs AUS: रोहित - विराट सिडनीत शेवटचा सामना खेळणार? दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य
IND vs AUS: यशस्वीच्या वादग्रस्त विकेटवर रोहितची शॉकींग Reaction;संघाचा कॅप्टन असं कसं म्हणू शकतो?

रवी शास्त्री यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या भविष्याबाबत बोलताना म्हटले की, विराट कोहली अजूनही ३-४ वर्ष क्रिकेट खेळू शकतो. तर रोहित शर्मा फलंदाजी करताना संघर्ष करताना दिसून येतोय. रवी शास्त्री यांच्या मते, विराट आणखी काही वर्ष क्रिकेट खेळू शकतो. तर रोहित शर्माला लवकरच निर्णय घ्यावा लागेल. त्याचा फुटवर्क आधीसारखा राहिलेला नाही.

रोहित शर्माकडून काय चूक होतेय?

रवी शास्त्री म्हणाले की, ' रोहित शर्मा आता शॉट खेळण्यात उशीर करतोय. त्यामुळे मालिकेच्या शेवटी त्याला विचार करावा लागेल. तुम्ही या मालिकेत पाहिलं असेल की, फलंदाजी करताना त्याचा पाय चेंडूच्या जवळ जात नाहीये. आता विराट कोहली आणि रोहित शर्मा आपल्या कसोटीतील भविष्याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

IND vs AUS: रोहित - विराट सिडनीत शेवटचा सामना खेळणार? दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य
IND vs AUS: जयस्वालची एकाकी झुंज 'अयशस्वी',भारताचा ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव, WTC Final हातून जाणार?

बॉर्डर- गावसकर मालिकेत फ्लॉप शो

या संपूर्ण मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. दोघेही संघातील प्रमुख फलंदाज आहेत. दोघेही टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करतात. मात्र टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करताना दोघेही संघाला हवी तशी सुरुवात करुन देऊ शकलेले नाहीत.

IND vs AUS: रोहित - विराट सिडनीत शेवटचा सामना खेळणार? दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य
IND vs AUS 4th Test: ऑस्ट्रेलियाचा 12th Man? आधी KL Rahul अन् आता जयस्वाल; स्निको मीटरने फिरवला गेम

या मालिकेबद्दल बोलायचं झालं, तर रोहित शर्माने या मालिकेतील ३ सामन्यांमध्ये अवघ्या ३१ धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे विराट कोहलीने पहिल्याच सामन्यात शानदार शतकी खेळी केली होती. त्याने या मालिकेतील ४ सामन्यांमध्ये आतापर्यंत १६७ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com