jasprit bumrah saam tv news
क्रीडा

Jasprit Bumrah: दुसरी कसोटी जिंकूनही टीम इंडियाला मोठा धक्का! तिसऱ्या कसोटीतून बुमराह बाहेर?

Ankush Dhavre

IND vs ENG 3rd Test, Jasprit Bumrah Injury:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला २८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कमबॅक करत १०६ धावांनी मिजय मिळवला आहे. (IND vs ENG)

यासह ही मालिका १-१ च्या बरोबरीत आली आहे. मालिकेतील तिसरा सामना येत्या १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. (Jasprit Bumrah News In Marathi)

माध्यमातील वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह राजकोट कसोटीतून बाहेर होऊ शकतो. त्याला तिसऱ्या कसोटीतून विश्रांती दिली जाऊ शकते. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र हे जवळ जवळ निश्चित आहे की, तो राजकोट कसोटीत खेळताना दिसून येणार नाही.

काय आहे कारण?

फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दमदार कामगिरी करतोय. तो या मालिकेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याने २ सामन्यांमध्ये १५ गडी बाद केले आहेत. बुमराहने हैदराबाद कसोटीत ६ गडी बाद केले. तर विशाखापट्टनम कसोटीत त्याने ९ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. यासह त्याने २५ गडी बाद केले. (Cricket news in marathi)

विशाखापट्टनम कसोटीत त्याने ७० पेक्षा अधिक षटकं टाकली. त्यामुळे वर्कलोड मॅनेज करण्यासाठी त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्याच्याऐवजी मोहम्मद सिराजला संधी दिली जाऊ शकते.

भारताचा शानदार विजय..

विशाखापट्टनमच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने दुसऱ्या डावात २५५ धावा करत इंग्लंडला विजयासाठी ३९९ धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव २९२ वर आटोपला. भारतीय संघाने या सामन्यात १०६ धावांनी विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT