csk saam tv news
Sports

IPL 2024: आयपीएल आधीच CSK ला मोठा धक्का! 14 कोटी खर्च करून घेतलेला प्लेअर गंभीर दुखापतग्रस्त

Daryl Mitchell: ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या अडचणीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघात स्थान देण्यात आलेला स्टार फलंदाज दुखापतग्रस्त झाला आहे.

Ankush Dhavre

Daryl Mitchell Injury:

आयपीएल २०२४ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्व संघांनी या स्पर्धेसाठची कसून तयारी सुरू केली आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या अडचणीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघात स्थान देण्यात आलेला न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डॅरील मिशेल दुखापतग्रस्त झाला आहे.

या दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाला आहे. यासह ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी -२० मालिकेतूनही त्याला बाहेर पडावं लागलं आहे. ही चेन्नई सुपर किंग्ज संघाचं टेन्शन वाढवणारी बाब ठरू शकते. कारण चेन्नई सुपर किंग्जने त्याला १४ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं आहे. (Cricket news in marathi)

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, डॅरील मिशेलच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत खेळताना दिसून येणार नाही. यासह ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी -२० मालिकेतूनही त्याला बाहेर राहावं लागणार आहेत. दरम्यान तो पूर्णपणे फिट होऊन केव्हा परतणार याबाबत कुठलीही अपडेट मिळू शकलेली नाही.

चेन्नईला मोठा धक्का..

डॅरील मिशेलने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दमदार खेळ केला होता. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पाचव्या स्थानी होता. स्पर्धेतील १० सामन्यांमध्ये त्याने ५५२ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने २ शतक झळकावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

SCROLL FOR NEXT