न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात शतक झळकावल्यानंतर दुसऱ्या डावातही केन विलियम्सनने शतक झळकावलं आहे. या शतकी खेळीसह न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा २८१ धावांनी धुव्वा उडविला आहे. यादरम्यान त्याने मोठ्या रेकॉर्डमध्ये इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटला मागे सोडलं आहे.
हे केन विलियम्सनच्या कसोटी कारकिर्दीतील ३१ वे शतक ठरले आहे. या शतकी खेळीसह त्याने कसोटीत सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या बाबतीत जो रूटला मागे सोडलं आहे. जो रूटच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये ३० शतकं झळकावण्याची नोंद आहे. या सामन्यातील पहिल्या डावात शतक झळकावल्यानंतर त्याने सर्वाधिक शतकं झळकावण्याचा बाबतीत विराट कोहलीला मागे सोडलं होतं. विराट कोहलीच्या नावे २९ शतकं झळकावण्याची नोंद आहे. (Cricket news in marathi)
हे आहेत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळाकावणारे फलंदाज..
सचिन तेंडुलकर - ५१ शतक
जॅक कॅलिस - ४५ शतक
रिकी पाँटिंग - ४१ शतक
कुमार संगकारा - ३८ शतक
राहुल द्रविड - ३६ शतक
यूनिस खान - ३४ शतक
सुनील गावसकर - ३४ शतक
ब्रायन लारा - ३४ शतक
महेला जयवर्धने - ३४ शतक
अॅलिस्टर कुक - ३३ शतक
स्टीव्ह स्मिथ - ३२ शतक
स्टीव्ह वॉ - ३२ शतक
केन विलियम्सन - ३१ शतक*
दक्षिण आफ्रिकेचा डाव १६२ धावांवर संपुष्टात..
या सामन्यातील पहिल्या डावात दुहेरी शतक झळकावणारा रचिन रविंद्र दुसऱ्या डावात अवघ्या १२ धावांवर माघारी परतला. न्यूझीलंडने पहिल्या डावात ५११ धावा ठोकल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या १६२ धावांवर संपुष्टात आला.
यासह न्यूझीलंडने ३४९ धावांची आघाडी घेतली. मात्र त्यांनी फॉलो ऑन दिला नाही. दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी ५२९ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव २४७ धावांवर आटोपला. यासह न्यूझीलंडने या सामना २८१ धावांनी जिंकला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.