Kane Williamson: न्यूझीलंडला मोठा धक्का! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीतून संघातील 'मॅच विनर' खेळाडू बाहेर

New Zealand vs South Africa: या सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे.
new zealand vs south africa
new zealand vs south africa Saam tv
Published On

Kane Williamson Ruled Out:

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. गेल्या २ सामन्यांमध्ये पराभूत झालेला न्यूझीलंडचा संघ या सामन्यातून कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

दरम्यान या सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणाऱ्या सामन्यातूनही न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) बाहेर पडला आहे. तो या सामन्यातही खेळताना येणार नाही. (Latest sports updates)

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने एक्स अकाउंटवरून पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहीले की,'केन विलियम्सन बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणाऱ्या सामन्यातही खेळताना दिसून येणार नाही. केन विलियम्सनने गेल्या २ दिवसांपासून नेट्समध्ये सराव केला आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यातून त्याला बाहेर करण्यात आलं आहे. पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी पुन्हा एकदा त्याचे आकलण केले जाईल.' (NZ vs SA)

new zealand vs south africa
World Cup Points Table: भारत- पाकिस्तानात होणार वर्ल्डकपची सेमीफायनल? बांगलादेशच्या पराभवानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

आयपीएल २०२३ स्पर्धेदरम्यान झाला होता दुखापतग्रस्त..

आयपीएल २०२३ स्पर्धेत त्याने गुजरात टायटन्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या संघाकडून क्षेत्ररक्षण करताना तो दुखापतग्रस्त झाला होता. काही महिने संघाबाहेर राहिल्यानंतर त्याने १३ ऑक्टोबर रोजी कमबॅक केले होते.

या सामन्यात त्याने ७८ धावांची खेळी केली होती. दरम्यान बांगलादेशविरुद्ध झालेल्या या सामन्यात फलंदाजी करत असताना त्याच्या अंगठ्याला चेंडू लागला होता. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं होतं. त्याच्या अंगठा फ्रॅक्चर असल्याचं समोर आलं होतं.

दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तो कमबॅक करेल अशी चिन्ह दिसत होती. मात्र आता न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने स्पष्ट केलं आहे की तो खेळणार नाही.

new zealand vs south africa
World Cup Points Table: अफगाणिस्तानच्या विजयानं पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर! या ३ संघांचं टेन्शन वाढलं

या सामन्यासाठी अशी असू शकते दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग ११:

डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लेथम (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, ईश सोढी, ट्रेंट बोल्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com