ICC Test Batsman Rankings: आयपीएल २०२३ (IPL 2023) स्पर्धेदरम्यान केन विलियमसन दुखापतग्रस्त झाला होता. दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. गेल्या काही महिन्यांपासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसून आला नाही. तरीदेखील तो आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. हे कसं झालं? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर सोप्या शब्दात समजून घ्या.
केन विलियमसनचं (Kane Williamson) कसोटी फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी येणं नक्कीच आश्चर्यचकित करणारं आहे. कारण गेल्या १०७ दिवसांपासून न्यूझीलंडचा संघ कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला नाही. न्यूझीलंडने शेवटचा कसोटी सामना १७ मार्च २०२३ रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. ऑगस्ट २०२१ नंतर केन विलियमसन पुन्हा एकदा कसोटीतील नंबर १ फलंदाज बनला आहे. आयपीएल २०२३ स्पर्धेदरम्यान क्षेत्ररक्षण करत असताना तो दुखापतग्रस्त झाला होता. (ICC Test Ranking)
अॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना झाल्यानंतर जो रूट अव्वल स्थानी पोहोचला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात केलेल्या फ्लॉप कामगिरीनंतर तो पाचव्या स्थानी पोहोचला आहे. (Latest sports updates)
स्टीव्ह स्मिथला नंबर १ बनण्याची संधी..
सध्या जोरदार फॉर्ममध्ये असलेला स्टीव्ह स्मिथ ४ फलंदाजांना मागे सोडत दुसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. स्टीव्ह स्मिथचे रेटिंग पॉइंट्स ८८२ आहेत. तो रेटिंग पॉइंट्सच्या बाबतीत केन विलियमसनपेक्षा केवळ १ पॉइंटने मागे आहे.
अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात जर स्टीव्ह स्मिथने चांगली कामगिरी केली तर तो नंबर १ बनू शकतो. हा क्षण त्याच्यासाठी अविस्मरणीय क्षण असू शकतो. कारण याच मैदानावर तो आपल्या कारकिर्दीतील १०० वा सामना खेळण्यासाठी उतरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.