chinnaswamy stadium stampede fir against rcb  x
Sports

विराट कोहलीच्या RCB वर मोठी कारवाई, चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर गुन्हा दाखल

Royal Challengers Bengaluru : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरले. यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर चाहत्यांनी गर्दी केली. तेव्हा चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला. एकूण प्रकरणानंतर आरसीबीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Yash Shirke

चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या २४ तासांनंतर कारवाई करण्यात आली आहे. आरसीबी, डीएनए (इव्हेंट मॅनेजर), कर्नाटक क्रिकेट असोसिएशन यांच्या विरोधात क्यूबन पार्क पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये कलम १०५, १२५ (१) (२), १३२, १२१/१, १९० आर/डब्ल्यू ३ (५) या कलमाचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. निष्काळजीपणामुळे चेंगराचेंगरी झाली आणि ११ जणांना जीव गमावावा लागला असा आरोप केला जात आहे.

३ जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली. त्यानंतर संघाची विजयी मिरवणूक होणे अपेक्षित होते. ४ जूनला सकाळी रस्त्यावर लोक जमू लागले. गर्दीचा अंदाज आल्यानंतर पोलिसांनी मिरवणूकीसाठीची परवानगी नाकारली. हा विजयोत्सव पुढे ढकलण्याची विनंती पोलिसांनी केली. रविवारी ८ जून रोजी कार्यक्रम व्हावा असे पोलिसांनी सुचवले होते.

परदेशी खेळाडू त्यांच्या देशात परततील असा युक्तिवाद आरसीबीने केला. ४ जून रोजीच हा विजयोत्सव व्हावा असे त्यांचे मत होते. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पोलीस आयुक्त बी दयानंद यांना चेंगराचेंगरीच्या घटनेच्या चौकशीत सामील होण्याबाबतची नोटीस बजावण्यात आल्याचे बंगळुरू शहराचे उपायुक्त जी जगदीश यांनी दिली आहे.

बुधवारी (४ जून) झालेल्या चेंगराचेंगरीच्या ठिकाणी पोलिसांकडून पाहणी करण्यात आली. लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांच्या गर्दीत गोंधळ झाला. चेंगराचेंगरीमध्ये ११ जणांना त्यांचा जीव गमावावा लागला. ५० पेक्षा जास्त लोक जखमी झाले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या घटनेची दखल घेतली आहे. आयोगाने जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना नोटीस पाठवून एका आठवड्याच्या आत अहवाल मागवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Alert in Maharashtra : पाऊस आज कहर करणार, ७ जिल्ह्यांना रेड अलर्ट, IMD च्या इशाऱ्यानंतर २ जिल्ह्यातील शाळा-कॉलेज बंद

Shukrwar che Upay: शुक्रवारच्या 'या' उपायांनी भाग्याचे दरवाजे उघडतील; घरात सुख-समृद्धी सोबत पैसाही येईल

Todays Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींना आज जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी; जाणून घ्या राशीभविष्य

Farmer Protest: बळीराजाचा एल्गार, कर्जमाफीसाठी 'चक्का जाम'; शेतकऱ्यांच्या मरणयातना कधी थांबवणार?

Harshal Patil: हर्षल पाटीलच्या आत्महत्येला सरकार जबाबदार? पाणीपुरवठा मंत्र्यांनी झटकले हात?

SCROLL FOR NEXT