Manasvi Choudhary
साडी किंवा ड्रेस एथनिक लूकवर केसांत गजरा माळणे हे महिलांना आवडते. केसात गजरा माळल्यानंतर महिला खुपच सुंदर दिसतात.
गजरा लावणाच्या या 5 स्टाईल्स तुमचा लूक सुंदर बनवतील तुम्ही देखील या स्टाईल्स नक्की ट्राय करा.
मोठ्या केसांची वेणी घालून त्यावर तुम्ही वरपासून खालपर्यंत गजरा माळा. खास काठपदर साड्यांवर तुम्ही ही स्टाईल करू शकता.
तुम्हाला जर केसांचा आबांडा घालून त्यावर गोलाकार गजरा लावायचा असेल तर तुम्ही ही देखील स्टाईल करू शकता. ट्रेडिशनल साडी लूकवर अशी स्टाईल एकदम भारी दिसेल.
केसांचा मोठा अंबाडा घालून त्यावर तुम्ही पूर्ण गजरा माळून अंबाडा झाकायचा आहे. ही स्टाईल सध्या ट्रेंडमध्ये आहे तु्म्ही खास लग्नात ही स्टाईल करू शकता.
मोकळे केस ठेवून त्यावर तुम्ही अर्ध चंद्र असा गजरा लावू शकता. एथनिक लूकवर ही स्टाईल एकदम सुंदर दिसते.
वेणीमध्ये बटांमध्ये तुम्ही गजरा माळायचा आहे. यामध्ये तुम्ही फुले देखील लावू शकता हा एक युनिक आणि सुंदर लूक वाटेल.
next: Banarasi Saree Design: बनारसी साड्यांचे एका पेक्षा एक डिझाईन्स, हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा