

Abhishek Sharma, India vs England semi final : मुंबईतील वानखेडे मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्या टी२० विश्वचषकातील उपांत्य फेरीचा दुसरा सामना होणार आहे. कोलकात्यामध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. ८ मार्च रोजी अहमदाबादच्या मैदानात न्यूझीलंड विश्वचषक जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील विजेता संघ रविवारी न्यूझीलंडविरोधात मैदानात उतरले. त्याआधी आज मुंबईच्या मैदानात इंग्लंड आणि भारत यांच्या लढत होणार आहे. आजच्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेईंग ११ मध्ये बदल होईल का? असा प्रश्न लाखो क्रिकेट चाहत्यांना सतावत आहे.
टी२० विश्वचषकात भारताची टॉप ऑर्डर फ्लॉप गेली आहे. इशान किशन आणि संजू सॅमसन यांनी एक एक मॅच विनिंग खेळी केली आहे. अभिषेक शर्मा प्लॉप गेलाय. संजू सॅमसन याने कोलकात्यात केलेल्या ९७ धावांच्या खेळीच्या बळावर भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पण फायनलमध्ये जाण्यासाठी टीम इंडियाला सांघिक योगदान द्यावेच लागेल. अभिषेक शर्मा खराब फॉर्ममध्येच आहे, त्यामुळे त्याला प्लेईंग ११ मध्ये संधी मिळेल का? त्याचा पत्ता कट होणार की गौतम गंभीर अभिषेक शर्मावर आणखी विश्वास ठेवणार, याकडे भारतीयांचे लक्ष लागलेय. पण क्रीडा विश्लेषकांच्या मते, उपांत्य सामन्यात भारतीय संघात बदल होण्याची शक्यता धुसरच आहे. कारण, प्लेईंग ११ मधील बदलामुळे अनुचित झाले तर प्रश्न उपस्थित होऊ शततात. त्यामुळे प्लेईंग ११ मध्ये बदल होण्याची शक्यता नाही.
वानखेडेवरील सामन्याआधी रवि शास्त्री म्हणाले की, सध्याच्या फॉर्मच्या आधारावरच प्लेईंग ११ मध्ये बदल करण्याचा विचार करावा. गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यापूर्वी , माजी भारतीय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी प्लेइंग इलेव्हनबद्दल त्यांचे मौल्यवान मत मांडले आहे. शास्त्री यांचा असा विश्वास आहे की संघ व्यवस्थापनाने सध्याच्या फॉर्मच्या आधारे बदलाचा विचार करावा. संघ व्यवस्थापनाला अभिषेक शर्मा मानसिकदृष्ट्या आरामदायी नाही आणि सतत कमी धावसंख्येमुळे त्याच्या आत्मविश्वासावर परिणाम झाला आहे, असे वाटत असेल तर यावर गंभीर निर्णय घेतला पाहिजे, असे शास्त्री म्हणाले. ते म्हणाले की, त्याची फलंदाजी, देहबोली आणि नेटमधील संवादाच्या आधारे हे मूल्यांकन केले पाहिजे. अभिषेक शर्माने स्पर्धेत आतापर्यंत सहा डावांमध्ये फक्त ८० धावा केल्या आहेत. त्याची सरासरी १३.१३ आणि स्ट्राईक रेट १३१.१५ आहे. त्यामुळे बाद फेरीच्या सामन्यांपूर्वी त्याचा फॉर्म चिंतेचा विषय आहे.
रिंकूला संधी मिळणार का?
अभिषेक शर्माला संघाबाहेर बसवले तर इशान किशन आणि संजू सॅमसन यांनी डावाची सुरूवात करावी. त्याशिवाय रिंकु सिंह याला संधी द्यायला हवी. वानखेडेच्या मैदानावर रिंकु सिंह शानदार फिनिश देऊ शकतो. दुसरीकडे इशान किशन याने चांगली कामगिरी केली. इशान किशनने या स्पर्धेत सात डावांमध्ये २२४ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ३२ आहे. तर त्याचा स्ट्राईक रेट १८५.१३ आहे. संजू सॅमसनच्या कमबॅकनंतर इशानला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली आहे.
अभिषेक अन् वानखेडेवरचा शानदार रेकॉर्ड
अभिषेक शर्माचा इंग्लंडविरुद्धचा एक शानदार विक्रम आहे. गेल्या वर्षी वानखेडे येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या टी-२० सामन्यात त्याने ५४ चेंडूत १३५ धावांची स्फोटक खेळी केली. या खेळीची आठवण करून देताना शास्त्री यांनी स्पष्ट केले की त्यांचा सल्ला केवळ सध्याच्या फॉर्मवर आणि संघाच्या स्फोटक फलंदाजीच्या पर्यायांच्या गरजेवर आधारित होता. अभिषेकला पूर्णपणे संघाबाहेर ठेवण्याच्या बाजूचे नाहीत, असेही ते म्हणाले.
भारताची संभाव्य प्लेइंग ११ :
इशान किशन, संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव , हार्दिक पांड्या, रिंकू सिंग/अभिषेक शर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.