Farmer : शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ई-पीक पेरा नोंदणीत मिळाला दिलासा

Maharashtra e crop registration offline photo facility : इंटरनेट नसतानाही पिकाचा फोटो काढून ठेवता येणार असून नेटवर्क मिळाल्यावर तो आपोआप प्रणालीवर अपलोड होईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, नेमका कुणाला लाभ?
Maharashtra Government saam tv
Published On

how to upload crop photo without internet e peek pera : राज्यातील ई-पीक पेरा नोंदणी प्रक्रियेत नेटवर्क किंवा सर्व्हरच्या अडचणीमुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून ऑफलाइन फोटो नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी नेटवर्क नसतानाही आपल्या शेतातील पिकाचा फोटो काढून ठेवला तर नेटवर्क उपलब्ध झाल्यानंतर तो आपोआप प्रणालीवर अपलोड होईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या तासात आमदार अनिल पाटील यांनी राज्यातील पीक पेरा नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

पाटील यांनी सांगितले की, २०२१ पासून ई-पीक पेरा प्रणाली मोठ्या प्रमाणावर सुरू झाली असून २०२५-२६ पासून ती कडक पद्धतीने अंमलात आणली जात आहे. मात्र ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नेटवर्क नसणे, सर्व्हर डाऊन होणे, जीपीएस त्रुटी तसेच संबंधित अधिकाऱ्यांची अनुपलब्धता यामुळे शेतकऱ्यांना पीक पेरा नोंदणी करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे नेटवर्क समस्यांवर उपाय, ऑफलाइन सुविधा, जनजागृतीसाठी विशेष शिबिरे आणि जिल्हा स्तरावर हेल्पडेस्क उभारण्याबाबत सरकार काय उपाययोजना करणार आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, नेमका कुणाला लाभ?
लेकीसाठी बाप वाघ झाला! छेडणाऱ्याला कॉलेजमध्ये तुडवले, पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील प्रकार

महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, ई-पीक पेरा नोंदणीसाठी आता डीसीएस (DCS) प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना नेटवर्क उपलब्ध नसतानाही शेतातील पिकाचा फोटो मोबाईलवर घेता येतो. नेटवर्क उपलब्ध झाल्यानंतर तो फोटो आपोआप प्रणालीवर अपलोड होतो. त्यामुळे नेटवर्क नसल्यामुळे नोंदणी थांबण्याची समस्या कमी होणार आहे.

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, नेमका कुणाला लाभ?
Thackeray Brothers : ठाकरे बंधुंमध्ये पुन्हा बिनसलं? राज ठाकरेंनी नाकारला उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव; राजकारणात मोठी खळबळ

या प्रक्रियेत सुमारे ८० टक्के नोंदणी शेतकऱ्यांनी स्वतः करावी, असा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित नोंदणी महसूल विभागाच्या माध्यमातून केली जाते. काही शेतकरी तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी करू शकत नसल्यास तलाठी, महसूल सहाय्यक किंवा नियुक्त सहाय्यक यांच्या माध्यमातून पीक पेरा नोंदवला जातो. ई-पीक पेरा नोंदणीची प्रक्रिया साधारणपणे पेरणीनंतर पहिल्या ५५ दिवसांत शेतकऱ्यांनी स्वतः करायची असते. त्यानंतर उर्वरित नोंदणी महसूल विभागाच्या माध्यमातून पूर्ण केली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील नोंदणीच्या प्रगतीबाबत माहिती देताना बावनकुळे म्हणाले की, काही जिल्ह्यांमध्ये चांगली प्रगती झाली आहे.

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, नेमका कुणाला लाभ?
Housing Society : मोठी बातमी! सोसायट्यांना आता 'NA' टॅक्स भरावा लागणार नाही; थकबाकीही माफ, राज्य सरकारचा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com