धक्कादायक! पतीने कापलं पत्नीचे नाक, चाकूने केले स्तनावर वार; चरित्र्याच्या संशयातून राक्षसी कृत्य

Crime News : एका व्यक्तीने त्याच्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात पत्नीचे नाक कापले गेले, स्तनावर वार झाल्याने महिला गंभीररित्या जखमी झाले. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. चारित्र्याच्या संशयातून हा हल्ला झाल्याचे म्हटले जात आहे.
Crime News
Crime Newsx
Published On

चारित्र्यावर संशय घेत एका तरुणाने त्याच्या बायकोवर प्राणघाती हल्ला केला. आरोपीने पत्नीचे नाक आणि उजवे स्तन चाकूने कापले. गंभीररित्या जखमी झालेल्या महिलेला शाजापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडित महिला आणि तिच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. मध्यप्रदेशच्या राजगड जिल्ह्यातील सांरगपूर येथे धक्कादायक घटना घडली आहे.

'माझ्या पतीला दारूचे व्यसन आहे. तो दारू पिऊन अनेकदा माझ्याशी भांडतो. चार महिन्यांपूर्वीही त्याने माझ्यावर तलवारीने हल्ला केला होता. हल्ल्यात माझ्या दोन्ही हातांना गंभीर जखमा झाल्या होत्या. यानंतर मी माझ्या माहेरी राहायला गेले. माझ्या मुलींसह मी आईवडिलांच्या घरी राहत होते. एका कामानिमित्ताने मी घराबाहेर पडले. बाजारात माझ्या नवऱ्याने मला गाठले. जबरदस्तीने सासरी घेऊन गेला. तिथे माझ्यावर हल्ला केला', अशी माहिती पीडित महिलेने दिली आहे.

Crime News
पूजा केलीस तर खबरदार, बुरखा घालत जा नाहीतर...; धर्मांतरासाठी दोन महिलांचा छळ, महाराष्ट्र हादरला

बाजारातून जबरदस्तीने सासरी नेल्यानंतर आरोपीने पीडित महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर चाकूने पीडितेवर हल्ला केला. या हल्ल्यात पीडित महिलेचे नाक आणि उजवे स्तन कापले गेले. 'माझा मुलीला जावयाने याआधीही मारहाण केली होती. त्याने तलवारीने माझ्या मुलीवर हल्ला केला होता. तो दारु पिऊन अनेकदा तिला (पीडिता) मारहाण करायचा' असे पीडित महिलेच्या आईने पोलिसांना सांगितले.

Crime News
भारतासाठी आनंदाची बातमी! इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज पहिल्या कसोटीतून बाहेर, शुभमन गिलचं टेंशन हलकं झालं

आरोपी पती त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. या संशयी प्रवृत्तीमुळेच आरोपीने त्याच्या पत्नीवर धारदार चाकूने हल्ला केला. तिचे नाक आणि स्तन कापले. शाजापूरच्या जिल्हा रुग्णालयात महिलेला दाखल करण्यात आले आहे. महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री सारंगपूरच्या पाडल्या माता गावात घडली आहे. आरोपीच्या विरुद्ध पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Samruddhi Expressway : कसारा ते इगतपुरी फक्त ५ मिनिटात, महाराष्ट्रातील सर्वात लांब ट्विन टनल वाहतुकीसाठी खुला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com