पूजा केलीस तर खबरदार, बुरखा घालत जा नाहीतर...; धर्मांतरासाठी दोन महिलांचा छळ, महाराष्ट्र हादरला

Nashik News : नाशिकमध्ये दोन महिलांचा धर्मांतरासाठी छळ झाल्याचे समोर आले आहे. नाशिकच्या अंबड आणि सातपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
Nashik News
Nashik Newsx
Published On

अभिजीत सोनावणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

नाशिकमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकरणांत धर्मांतरासाठी महिलांवर झालेल्या अत्याचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंबड आणि सातपूर या दोन पोलीस ठाण्यांत यासंदर्भातील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही प्रकरणांत आरोपींना अटक करण्यात आली आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून महिलांचा छळ सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही महिलांवर फसवून, धमकावून व जबरदस्तीने धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

पहिल्या प्रकरणात अंबड परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेवर पती आणि सासरच्या मंडळींनी धर्मांतर करण्यासाठी सातत्याने दबाव आणला. ‘धर्मांतर कर नाहीतर तुझ्यासह मुलांना ठार मारेन’ अशी धमकी देत तिचा छळ करण्यात आला. विवाहितेचा विवाह हिंदू पद्धतीने झाला असला तरी तिच्या पतीने इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी अनेक वेळा शारीरिक व मानसिक छळ केला. तिच्यावर चॉपर दाखवत प्रॉपर्टी नावावर करण्याची जबरदस्ती करण्यात आली, तसंच देवदेवतांचे फोटो फेकून धार्मिक भावना दुखावल्याचा प्रकारही घडला. पोलिसांनी पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Nashik News
भारतासाठी आनंदाची बातमी! इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज पहिल्या कसोटीतून बाहेर, शुभमन गिलचं टेंशन हलकं झालं

दुसऱ्या प्रकरणात, दिल्लीतील एका हिंदू तरुणीला नाशिकला आणून एका मुस्लिम तरुणाने ‘राजू’ हे बनावट नाव सांगत तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून २०१३ पासून तिच्याशी जबरदस्ती संबंध ठेवले आणि २०१६ मध्ये ती गर्भवती राहिली. नंतर तो मुस्लिम असल्याचे समजल्यावर तिने विरोध केल्यावर तिला घरातून हाकलण्याची धमकी दिली गेली. हिंदू धर्माप्रमाणे पूजा करणे बंद करण्यास, आणि बुरखा घालण्यास भाग पाडले गेले. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Nashik News
Samruddhi Expressway : कसारा ते इगतपुरी फक्त ५ मिनिटात, महाराष्ट्रातील सर्वात लांब ट्विन टनल वाहतुकीसाठी खुला

या प्रकरणावर बोलताना सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी माहिती दिली. ते म्हणाले, 'दोन्ही प्रकरणांत महिला हिंदू असून आरोपी मुस्लिम आहेत. या महिलांवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यात आले आहेत. अपत्यावरही धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला. सध्या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरु असून, फिर्यादींच्या तक्रारीनुसार कठोर कारवाई केली जाईल.' हे प्रकरण धार्मिक फसवणुकीचं आणि गंभीर गुन्ह्याचं उदाहरण असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

Nashik News
खासदार महिलेनं गुपचूप उरकलं दुसरं लग्न, पतीसोबतचे फोटो झाले व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com