

नाशिकच्या इगतपुरी येथील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात धक्कादायक प्रकार घडला
दहावीच्या ७ विद्यार्थ्यांनी ५ वी ते ७ वीच्या मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केला
गुंगीचे औषध आणि दारू पाजून अत्याचार केल्याचा पीडितांचा आरोप.
गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता
नाशिकच्या इगतपुरीमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली. याठिकाणी अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. इगतपुरीच्या समाज कल्याण विभागांतर्गत सुरू असलेल्या वसतिगृहात ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे. वसतिगृहातील दहावीच्या ७ विद्यार्थ्यांनी हे भयंकर कृत्य केले. या प्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात आरोपी मुलांविरोधामध्ये रॅगिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरीमध्ये समाजकल्याण विभागाचे वसतिगृह आहे. या वसतिगृहामध्ये नाशिकसह आसपासच्या जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षण घेतात. याठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या वसतिगृहातील दहावीच्या विद्यार्थ्यांकडून ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले. गुंगीचे औषध देऊन आणि दारू पाजून अत्याचार करण्यात आले असल्याचा आरोप पिडीत विद्यार्थ्यांसह पालकांनी केला आहे. गेल्या सात महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. आरोपी मुलांना घाबरून पीडित मुलांनी हा प्रकार कुणाला सांगितला नाही.
पीडित मुलांच्या पालकांच्या तक्रारीनंतर इगतपुरी पोलिस ठाण्यात ७ विधी संघर्ष बालकांसह वसतिगृह अधीक्षकावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फॉरेन्सिक टीमकडून वसतिगृहाची पाहणी करण्यात आली. संशयित आरोपींना आज बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाणार आहे. या घटनेमुळे नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. इगतपुरी पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणात आणखी किती जण आहेत याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
असे सांगितले जात आहे की, 'रॅगिंगच्या नावाखाली दहावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले. पीडितांच्या जबाबांवरून असे दिसून आले की, गेल्या सहा ते सात महिन्यांपासून हे घडत होते. २२ फेब्रुवारी रोजी त्यांनी वसतिगृह अधीक्षकांसमोर हा विषय उपस्थित केला. त्यानंतर अधीक्षकांनी दहावीच्या मुलांच्या पालकांशी संपर्क साधला आणि त्यांना घरी घेऊन जाण्यास सांगितले. त्यांनी पीडितांच्या पालकांनाही बोलावले. पीडितांपैकी एकाच्या पालकाने मंगळवारी दहावीच्या मुलांविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण समोर आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.