बंगळुरूमध्ये एका अभिनेत्रीने बॉयफ्रेंडच्या मदतीने लिव्ह-इन पार्टनरची निर्घृण हत्या केली
पार्टीचे आयोजन करून मोहन रावला दारू पाजण्यात आली आणि नंतर त्याची हत्कया केली
घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर हे हत्याकांड प्रकरण समोर आले
पोलिसांनी अभिनेत्री उर्मिला उर्फ बिंदू, तिचा बॉयफ्रेंड आणि मित्राला अटक केली
बंगळुरूमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. एका अभिनेत्री बॉयफ्रेंडच्या मदतीने लिव्ह इन पार्टनरची निर्घृण हत्या केली. ही घटना बंगळुरूच्या मंजनाथनगर भागात घडली. कन्नड अभिनेत्री उर्मिला उर्फ बिंदूने लिव्ह इन पार्टनरसोबत लग्न करण्याऐवजी दुसऱ्याच व्यक्तीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिने बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इन पार्टनरचा काटा काढायचा ठरवलं. त्यानंतर त्याची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी अभिनेत्रीसह ३ जणांना पोलिसांनी अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव मोहन राव होते. १८ फेब्रुवारीला मोहन रावची हत्या करण्यात आली होती. मोहन राव हा टीव्ही अभिनेत्री उर्मिलासोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. उर्मिला उर्फ बिंदूने 'बजरंगी', 'पुलिस क्वार्टर्स' आणि 'कालभैरव' यासारख्या टीव्ही मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या आहेत. बिंदू आणि तिचा बॉयफ्रेंड विनयने लग्नाचा निर्णय घेतला होता. पण या लग्नामध्ये उर्मिलाचा लिव्ह इन पार्टरनर आडवा येत होता. त्यामुळे दोघांनी त्यांची हत्या करण्याचा प्लान केला.
या प्लाननुसार घरामध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. उर्मिला आणि मोहन ज्याठिकाणी एकत्र राहत होते त्याचठिकाणी या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये मोहनला दारू पाजण्यात आली त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. उर्मिलाचा बॉयफ्रेंड विनयने मित्र धनुषच्या मदतने मोहनवर अनेक वेळा चूकने वार केले. जेव्हा मोहन ओरडू लागला तेव्हा उर्मिलाने त्याच्या तोंड आणि नाकावर टेप बांधली. त्यानंतर त्यचे हात-पाय बांधले.
मोहनची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. १२ दिवसानंतर घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे शेजारच्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा तोडला तेव्हा हे भयंकर हत्याकांड प्रकरण समोर आले. मोहनच्या शेजारी राहणाऱ्यांनी सांगितले की, ते घर नेहमीच बंद असायचे. २८ फेब्रुवारीला घरातून प्रचंड दुर्गंधी येत होती. घराचा मालक नटराजने पोलिसांना कळवले. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तर आतमध्ये मोहनचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी मोहनची लिव्ह इन पार्टनर उर्मिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यानंतर तिने हत्येचा गुन्हा कबुल केला. त्यानंतर पोलिसांनी उर्मिला, तिचा बॉयफ्रेंड आणि मित्राला अटक केली.
पोलिसांनी सांगितले की, हत्या करण्यात आलेला मोहन हा एक छोटा फायनान्सचा व्यसायात करत होता. बायकोपासून वेगळे झाल्यानंतर तो उर्मिलासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. उर्मिलाही तिच्या नवऱ्यासोबत राहत नव्हती. दोन महिन्यांपूर्वी उर्मिला आणि मोहन राव यांनी मंजनाथनगरमध्ये एक घर भाड्याने घेतले होते. त्यांनी औपचारिक भाडे करार केला नव्हता कारण त्यांनी एका महिन्याच्या आत घर रिकामे करण्याचे सांगितले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.